शहीद डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त घेतलेल्या ऑनलाइन निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न...


 विशेष प्रतिनिधी:-

दिनांक २ ऑक्टोंबर २०२१ रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा ठाणे च्या वतीने शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त २० ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाईन निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार वितरण समारंभ व कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर डोंबिवलीतील ज्ञानमंदिर संकुलाच्या आनंद दिघे सभागृहात संपन्न झाला. सदर निवड या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या ची नावे श्रद्धा वझे,वृध्दा लोखंडे,प्रिया तेली,दया देशमुख, हरिश्चंद्र दळवी व अनिता देशमुख या पुरस्कार विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. निबंधाचे परीक्षण ज्ञानमंदिर संकुलाच्या शिक्षिका सौ.विभा जाधव यांनी केले होते लॉकडाउन नंतर प्रथमच आयोजित केलेल्या या कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यातील नवीन सदस्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते. त्यामध्ये जगदीश चंदनशिवे, श्रीप्रसाद खुळे,डॉ. जाधव यांनी या विषयावर बांधणी करीत सदस्यांसमोर व्याख्यानासह प्रात्यक्षिके सादर केली या प्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी प्राध्यापक प्रवीण देशमुख, अशोक वानखडे, श्रीप्रसाद खुळे,अक्षता पाटील,गणेश चिंचोले व वंदना शिंदे यांच्यासह उदय शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्वश्री आशुतोष येवले, नितीन मालपुरे,नरहर शिरोडे, इत्यादी पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Previous Post Next Post