शेतकरी नरसंहार करणाऱ्या आशिष मिश्र यांच्यावर खुनाचे गुन्हे दाखल करून केंद्रीय गृह राज्यमंत्र्याचा राजीनामा घ्या- प्रसेनजीत पाटिल..


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी या गावात तीन कृषि कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलन करित असतांना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र यांच्या आशिष मिश्र नामक मुलाने गाडीने कुचळुन ५ शेतकऱ्यांची निर्घुन हत्या केली.या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या घटनेचा जाहिर निषेध करण्यात आला.शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्या आशिष मिश्र व त्याच्या कार्यकर्त्यांवर तात्काळ कार्यवाही करित खुनाचे गुन्हे दाखल करावे तसेच केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी या निवेदनातून जळगाव जामोद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली.घटना घडलेल्या ठिकाणी विरोधी पक्षातील नेत्यांना जाण्यास तेथील सरकार मज्जाव करित आहे हे लोकशाही विरोधी आहे. अशी हिटलरशाही याआधी आपन भारत देशात कधी पाहिली नाही. तसेच शेतकऱ्यांचा विरोध असतांना त्यांच्यावर कोणतेही कायदे लादने हे निंदनीय आहे याचा विचार देशाच्या पंतप्रधानांनी गांभिर्याने करावा व शेतकरी विरोधी तिन्ही कृषि कायदे तात्काळ रद्द करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिनांक ४ आक्टोंबर रोजी अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जामोदच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले. यावेळी प्रसेनजीत पाटिल प्रदेश सरचिटणीस, रमेश उमाळे,डॉ. प्रशांत दाभाडे तालुकाध्यक्ष, विश्वास भालेराव,अजहर देशमुख,अब्दुल जहीर शहराध्यक्ष, विठ्ठल वाघ, ईरफान खान, पराग अवचार,बाळू डिवरे,आशिष वायझोड़े,सिद्धार्थ हेलोडे, रोशन बुले, विष्णु रोठे, निजाम राज,संभाजी ठाकुर, योगेश घोपे, मोहसिन खान,राजू पाटिल अवचार,पंजाबराव वाघ,महादेव भालतड़क, आकाश पाटिल, स्वप्निल आटोळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post