जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांनी 25% अग्रीम विमा लाभात तसेच खरीप पिक विमा वाटपातील तफावत दूर करणे बाबत आणि ३ दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत पालकमंत्र्यांकडे आर्थिक मागणी जाहीर करण्यासाठी निवेदन दिले. दिनांक १८ ऑक्टोंबर ला शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आपल्या जिल्ह्यात जून व जुलै महिन्यात २५ दिवसांचा पावसाचा खंड पडला होता त्यामुळे काही भागातील मंडळांना खरीप २०२१ चा २५% भीमा दिवाळीपूर्वी अग्रिम स्वरूपात जाहीर केले असून त्यामधून जामोद मंडळाचा समावेश करण्यात आला नाही परंतु जामोद मंडळात सुद्धा जून व जुलै महिन्यात सतत २२ दिवस पावसाचा खंड पडला होता त्यामुळे पिकांची वाढ खुंटून उत्पादनात कमालीची घट झाली आहे म्हणून वगळलेल्या जामोद मंडळाचा सुद्धा समावेश या योजनेत करण्यात यावा या तालुक्यातील काही मंडळात एकरी ८ हजार ते १० हजार रुपये खरीप पिक विमा मिळाला तर काही मंडळात एकरी १ हजार ते २ हजार एवढी तटपुंजी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली ही तफावत दूर करण्यात यावी मागील तीन दिवसा पासून तालुक्यात मूसलाधार पाऊस सुरू असल्यामुळे सोयाबीन कपाशी मका पिकांचे अतोनात नुकसान झाले सोयाबीन व कपाशीला कोंब फुटलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादनखर्चही निघणार नाही त्यामुळे तात्काळ कार्यवाही करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी विनंती शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्ह्याचे पालक मंत्री यांना केली आहे निवेदनावर पंचायत समिती माजी सभापती प्रवीण भोपळे सरपंच खेर्डा बुद्रुक नरेश वानखडे सरपंच खेर्डा खुर्द गोपाळ उमरकर पुर्णाजी वानखडे निशिकांत देशमुख व इतर शंभर शेतकऱ्यांचे यांच्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी निवेदनावर आहे
खरीप पिक विम्यातील तफावत दूर व्हावी"अग्रिम विमा जामोद मंडळाचा समावेश व पिकांचे पंचनाम यासाठी शेतकऱ्यांचे पालकमंत्र्यांना साकडे"
जळगांव जा.प्रतिनिधी:-