28 वर्षीय विवाहित तरुण वारंवार करीत होता पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार.. मलकापूर शहरात घडलेली घटना...


 मलकापुर प्रतिनिधी:-

मलकापुर शहरातील एका 28 वर्षीय विवाहित तरुणाने दोन मुलींच्या सहकार्यातून एका 15 वर्षीय अल्पवयीन मुली चे शारीरिक उपभोग घेत या बाबत कुठेही वाच्यता करू नको अथवा सर्वत्र फोटो व्हायरल करेल अशी धमकी देऊन शारीरिक शोषण केल्याची घटना  दिनांक 17 आक्टोंबर रोजी उघडकीस आली असून पोलिसांनी पीडित अल्पवयीन मुलीच्या दिलेल्या तक्रारीवरून अपराध क्र.५५७/२०२१ कलम ३७६(२) (N), ३५४ आ (i), ५०६, ३४ आय पी सी सहकलम ४ बा.लै.अ.सं. अधिनियम २०१२ नुसार नोंदविली आहे. सदर प्रकाराने शहरात एकच खळबळ उडाली असून अल्पवयीन मुली किती असुरक्षित आहेत ही बाब नव्याने एकदा पुन्हा समोर आली आहे. विविध घटनांनी नेहमीच चर्चेत असणाऱ्या मलकापूर शहरात अंगावर काटा आणणारी घटना घडली असून शहरातील माता महाकाली नगर परिसरातील एका १५ वर्षीय मुलीला आपल्याच परिसरातील २ मुलींच्या सहाय्याने पीडित अल्पवयीन मुलीला फोन कॉल्स वर धमकावून गेल्या काही दिवसांपासून शारीरिक शोषण केले असल्याची फिर्याद शहर पोलिस स्टेशन ला दिल्या गेली. फिर्यादी नुसार पीडितेच्या परिवारातील सदस्यांना जिवे मारण्याच्या धमकितुन शारीरिक संबंध बनवण्याची घटना घडली आहे. पिडीतेला या नराधमाने विविध ठिकाणी नेवून  शाळेच्या खोल्यांमध्ये त्या पीडितेच्या अब्रूचे लचके तोडन्याचे क्रुकृत्य करीत होता.हा सर्व घटनाक्रम दाबण्याचा आग्रह त्या दोन सह आरोपी मुलींनी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. पीडितेच्या परिवाराला व पीडितेला तिचे न्यूड फोटो व्हायरल करण्याचे धमकी देण्यात आल्याने या वादातून घटना उघडकीस आली. व पीडितेच्या आई वडीलांनी पीडितेला घेऊन शहर पोलिस स्टेशन गाठले व फिर्याद दिली त्यानुसार आरोपीला आज रोजी पकडून गजाआड केले. व फिर्यादीवरून अपराध क्रमांक ५५७/२०२१ कलम ३७६ (२), ३५४, ५०६/ ३४ आयपीसी सह कलम ४ बाल लैंगिक अपराध संरक्षण अधीनियम २०१२ नुसार गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता म्हसाये ह्या करीत आहेत.या घटनेमुळे शहरातील अल्पवयीन मुली किती असुरक्षित आहे ही बाब एकदा पुन्हा नव्याने दिसून येत असून शहरातील वाढत्या गुन्हेगारी ला नेमके जबाबदार आहे तरी कोण अशी चर्चा मात्र यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Previous Post Next Post