"जीवनात यशस्वी होण्यासाठी हिंदुत्वाची पंचसूत्री स्वीकारावी"- अंबरीष पुंडलिक!!जळगाव जामोद नगराचा विजयादशमी उत्सव संपन्न...


जळगाव जामोद प्रतिनिधी:-

सहिष्णुता, समरसता, सेवा, स्वदेशी आणि सावधानता ही हिंदुत्वाची पंचसूत्री असून जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने या पंचसुत्रीचा अंगीकार करावा असे मौल्यवान मार्गदर्शन  अंबरीश पुंडलिक यांनी दि.२१ ऑक्टोबरच्या संध्याकाळी शहरातील दि. न्यू.ईरा हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित    विजयादशमी   उत्सवाला उपस्थितांना केले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या   जळगाव   जामोद नगर शाखेने विजयादशमी  उत्सवाचे आयोजन दि.२१ ऑक्टोबरच्या संध्याकाळी  शहरातील दि. न्यू.ईरा हायस्कूलच्या प्रांगणात केले हाेते  . या कार्यक्रमाला नगर संघचालक मिलिंद जोशी, प्रमुख अतिथी डॉ.अतुल गट्टाणी व प्रमुख वक्ते अंबरिष पुंडलिक यांची प्रमुख  उपस्थिती होती. यावेळी शहरातील नामांकित डॉ. अतुल गट्टाणी यांनी त्यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघामार्फत देशभरात सुरू असलेले   सेवाकार्य व  नैसर्गिक संकटाच्यावेळी संघ स्वयंसेवकांनी राबविलेले मदतकार्य  अनुभवी आल्यामुळे त्यांच्या जीवनाला सुयोग्य  दिशा मिळाल्याचे सांगितले. संघ शिबिरातील शिस्त व संस्कार याची खरी गरज नवीन पिढीला असल्याने आपली मुले सुसंस्कारित करण्याकरिता संघाच्या शिबिरे व शाखा महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले  . मुख्य शिक्षक देवसिंह चौहान  यांच्या मार्गदर्शनात विविध शारीरिक कार्यक्रम सादर करण्यात आले तर  अथर्व सकळकळे यांनी प्रार्थना,  सुनील ठाकूर यांनी सांघिक गीत  ,वैभव घुले यांनी सुभाषित  ज्ञानेश्वर वाढे यांनी अमृतवचन तर वैयक्तिक गीत आशीष सराफ यांनी सादर केले  .   प्रमुख अतिथींचे स्वागत नगर कार्यवाह मनोज सराफ यांनी तर प्रास्ताविक परिचय नगर सहकार्यवाह   रजनीकांत उपासे   यांनी उपस्थितांना करून दिला.   प्रमुख वक्ते अंबरीष  पुंडलिक यांनी  विजय विजयादशमी उत्सवाचे पौराणिक महत्त्व व राष्ट्रीय स्वयंसेवक  संघाची  भूमिका याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.  हिंदुत्व  हेच राष्ट्रीयत्व अशी भूमिका संघाची असून हिंदुत्व म्हणजे कोणत्याही धर्माला किंवा पंथाला विरोध करणे नव्हे तर या देशाला परम वैभवाकडे  नेण्याचा मानस संघाचा असल्याचे त्यांनी सांगितले .यावेळी परिसरातील संघप्रेमी व स्वयंसेवक बंधू   मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Previous Post Next Post