मलकापूर तालुक्यातील त्या घटनांचा रासप प्रहार तर्फे निषेध...


बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-

मलकापूर तालुक्यातील वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारांचा राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील व प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात मलकापूर येथे निषेध करण्यात आला तसेच मा मुख्यमंत्री यांना सदर घटनांच्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याचा बाबतचे निवेदन मा उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्यामार्फत देण्यात आले.गेल्या आठवड्यात तालुक्यामध्ये दोन ठिकाणी अल्पवयीन मुलींच्या बाबतीत घडलेल्या प्रकाराने समाजमन सुन्न झाले असून महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे .घरा शेजारील नातेवाइकांच्या शेजारी जर महिला लहान मुली सुरक्षित नसतील तर  या महिलांना सुरक्षा कोण देणार असा प्रश्न समोर येतो. कायद्याचे भय न बाळगता अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी जेणेकरून पुन्हा कोणी असे कृत्य करण्यास धजावणार नाही व कायद्याचा वचक निर्माण होईल .अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्ष व प्रहार जनशक्ती पक्ष तर्फे करण्यात आली.राष्ट्रीय समाज पक्ष व प्रहार जनशक्ती पक्ष या घटनेचा तीव्र निषेध करत  आरोपींना लवकरात लवकर शिक्षा देण्याची मागणी केली.यावेळी धनश्रीताई काटीकर पाटील  पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष, अजय टप उपजिल्हाप्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष, दामोदर जी शर्मा ज्येष्ठ नेते शेतकरी संघटना , बलराम बावस्कर ,उमेश जाधव, प्रकाश थाटे, सै ताहेर जिल्हा उपाध्यक्ष रासप, निलेश चोपडे , अजय बघे,अपरेशराजे तुपकरी, देवेंद्र महाले, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

Previous Post Next Post