वरणगाव येथील उच्चशिक्षित तरुणाचा व्यवसायाकडे कल...


 वरणगाव प्रतिनिधी - सुनिल पाचपोळ 

वरणगाव शहरातील एका सामान्य कुटुंबातील युवक जितेंद्र गजानन बावणे यांनी उच्चशिक्षण घेऊन बीई मेकॅनिकल या शाखेची पदवी घेऊन  नोकरी मिळेल या आशेने प्रयत्न सुद्धा केले पण नोकरी मिळणे अवघड झाले असून आपण काय करायचे हा विचार त्याच्या मनामध्ये सतत येत होता त्यात कोरणामुळे परिस्थिती  फारच बिकट होती व्यवसाय करायचे म्हटले तर भांडवल लागेल या भांडवलासाठी  मदत कुणाकडून घ्यायची हे सतत विचार सुरू होते  अशा परिस्थितीमध्ये दोन वर्षांपासून सतत विचारांमुळे सर्व रस्ते बंद झाले की काय असे वाटू लागले होते पण मनातील एक आत्मविश्वास व जिद्द व कष्ट करण्याची तयारी होती याच तत्वावर वरणगाव येथे आनंद टावर मध्ये श्रीराम कॅफे रेस्टॉरंट या नावाने आपण व्यवसाय सुरू करू अशी संकल्पना त्यांच्या मनामध्ये आली व त्यातूनच त्याने आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केला व त्याला  वरणगाव शहरातून व परिसरातून भरभराटी ने प्रतिसाद मिळत आहे व  सर्वांकडून कौतुक केले जात आहे अशा परिस्थितीमध्ये आणि कोरणासारख्या महामारी या व्यवसाय सुरू करणे म्हणजे तारेवरची कसरत होती पण एक नवीन संकल्पना आपल्या वरणगाव शहरात  आणण्याची एक जिद्द होती व आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे तसेच त्यामध्ये त्याने स्वतः ट्रेनिंग घेऊन पिज्जा बर्गर सँडविच आणि बरेच काही पदार्थ त्या ठिकाणी उपलब्ध केले आहे अशा प्रकारचा कॅफे ही संकल्पना वरणगाव शहरामध्ये प्रथमच पाहायला आपल्याला मिळत आहे व तसेच वरणगाव शहरांमध्ये स्विगी झोमॅटो नसताना सुद्धा आपली स्वतःची होम डिलिव्हरी सर्विस त्यामध्ये उपलब्ध करून दिले आहे अशा सुशिक्षित युवकांनी व्यवसाय करण्याचे धाडस दाखविले आहे या युवकाच्या सर्वत्र कौतुक होत आहे

Previous Post Next Post