दिनांक १७ ऑक्टोंबर रोजी दुर्गा विसर्जन निमित्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेषराव पाटील व पोलीस शिपाई सुरज गवईआडोळ येथे मोटरसायकल ने पेट्रोलिंग दरम्यान गेले असता आडोळ या गावांमध्ये जळगांव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेषराव पाटील यांना गुप्त बातमी दाराकडून बातमी मिळाली की कुरा काकोडा वरून दोन इसम पिंपळगाव काळे येथे मोटरसायकल वर विनापरवाना देशी दारू विकणारे व्यक्ती पळशीघाट शिवार वीटभट्ट्या जवळ वाहतूक करणार आहे, ही माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेषराव पाटील व पोलीस शिपाई सुरज गवई यांना घेऊन मोटारसायकलीने घटनास्थळी पोहोचले व गुप्त बातमी दाराकडून मिळालेल्या वर्णनाची मोटरसायकल घाटपळशी वीटभट्ट्या जवळ येताच त्यांनी तिला थांबवुन तपासणी केली असता मोटरसायकल बजाज सिटी १०० क्रमांक एम एच ३० टी.९२८८ ही मोटर सायकल योगेश घटे व शुभम बोदडे चालावीत होता सदर मोटर सायकलची तपासणी केली असता खाकी कलरचे ६ बॉक्स आढळले प्रत्येक बॉक्स मध्ये ४८ नग देशी दारू संत्रा ५००० अशा शिलबंद स्थिती मधील १८० एम एल च्या एकूण २८८ नग देशी दारू च्या शिष्या किंमत अंदाजे १७ हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला तसेच त्यांची मोटरसायकल ही विना कागदपत्राची असल्यामुळे मोटरसायकल सुद्धा जप्त करण्यात आली तिची किंमत अंदाजे ३० हजार रुपये असुन असा एकूण ४७ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल पंचा समक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव पाटील व पोलीस शिपाई सुरज गवई यांनी जप्त केला आहे. या विषयी दिनांक 18 ऑक्टोबर रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशन मध्ये सदर दोन इसमांनवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कलम ६५(ई),७७ (अ) ,दारूबंदी कायदा १३० /१७७, मोटार वाहन कायदा १५८/१७७ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेषराव पाटील व पोलीस शिपाई सुरज गवई हे करीत आहेत.
विनापरवाना देशी दारूची वाहतूक करणाऱ्या इसमांकडुन मोटरसायकल सह ४७ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेषराव पाटील यांची धडक कारवाई...
जळगांव जा.प्रतिनिधी:-अनिल भगत.