आजी-माजी सैनिकाच्या ज्या शासकीय समस्या असतील त्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत .असे प्रतिपादन सिंदखेड राजा येथील पंचायत समितीच्या सभागृहात दि .18 ऑक्टोंबर रोजी आयोजित सैनिक दरबार मध्ये सिनखेडराजा तहसीलदार सुनील सावंत यांनी केले .तसेच माजी सैनिक दरबारामध्ये 25 सैनिकांनी आपल्या तक्रारी नोंदवली असून आठवड्याभरातच त्या संपूर्ण तक्रारीचा निवारण करण्यात येणार आहे .असेही यावेळी मार्गदर्शन करताना तहसिलदार सुनील सावंत यांनी सांगितले .आजी-माजी सैनिकाचा सिनखेडराजा येथे सैनिक दरबार आयोजित केला होता ज्यामध्ये आजी-माजी सैनिकाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सैनिक दरबार आयोजित केला होता .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार सुनील सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती .यावेळी सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान .तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक घुगे .गटविकास अधिकारी यांचे प्रतिनिधी अंकुश मस्के .कार्यालय अधीक्षक नेमाडे .सैनिक कल्याण समितीचे तालुकाध्यक्ष सुभेदार द्वारकानाथ मस्के .उपाध्यक्ष फकीरा जाधव बाबुराव खरात यांच्यासह तालुक्यातील आजी माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नी यावेळी उपस्थित होते ..
सिंदखेडराजा तालुक्यातील आजी-माजी सैनिकांच्या शासकीय समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध -तहसीलदार - सुनील सावंत /सिंदखेड राजा येथे सैनिक दरबार..
सिंदखेड राजा/सचिन खंडारे .