जीवन विकास संस्थेच्या सबल कार्यक्रमा अंतर्गत मिळाला आदिवासीना रोजगार...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

जीवन विकास संस्थेतर्गत उपजीविका कार्यक्रमामुळे चिखलदरा तालुक्यातील चुरणी क्लस्टर व मलकापूर क्लस्टर मधील ६१ गरीब परिवाराला मिळाला आधार  जीवन विकास संस्था,परतवाडाच्या .या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण तसेच आदिवासी समुदायाचा सक्षमीकरणासाठी तसेच त्यांना समाजाचा मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी संस्था अविरत कार्य करीत आहे .याच कार्याचा एक भाग म्हणून संस्थेमार्फत सबल परियोजना कोरकू जनजतीच्या हिता करिता एकी कृत  खाद्य आणि पोषण सुरक्षा या प्रकलपा अंतर्गत कुपोषण मुक्ती ,जैविक शेती ,शासकीय योजना संदर्भात जनजागृती मार्गदर्शन,मुदा व जल सांधारन उपजीविका कार्यक्रम तसेच सामाजिक,आर्थिक सक्षिमिकरन व मुख्य प्रवाहात आणणे हा संस्थेचा माणसं आहे .या अनुषंगाने उपजीविका कार्यक्रमतून आर्थिक धुष्टिने गरीब परिवार,अपंग परिवार,विधवा एकल परिवार,आजारी,कुपोषित परिवार,वृध्द अशा प्रकारच्या ६१ परिवाराला सबल कार्यक्रमा अंतर्गत मदत दिल्या गेली.या मध्ये ४९ परिवाराला प्रत्येकी ७००० रुपयाची मदत दिल्या गेली.तसेच १२ परिवाराना प्रत्येकी १०००० रुपयांची मदत करण्यात आले व तेवढेच किंवा त्या पेक्षा ज्यास्त त्या लाभार्थ्यांनी टाकले अशा प्रकारे दुकानाची संकलपना मूर्त रुपात आली.यामध्ये किराणा दुकान, रेडियम कापड दुकान,स्टेशनरी दुकान,कटलरी,मोटार सायकल दुरुस्ती केंद्र,चिकन केंद्र, दळण केंद्र,नाश्ता केंद्र,भाजी पाला विक्री केंद्र,हॉटेल,शिलाई केंद्र, बुट हाऊस,बकरी पालन अशा प्रकारच्या विविध   लघु व्यवसाय ४७ गावात सुरू झाले आहेत. व ते चांगल्या रीतीने चालू आहेत प्रतेक दुकानदार १५० ते २०० रुपये रोज कमवत आहे.या आवजिका कार्यक्रमा मूळे ३९ परिवाराना आपण स्थंतरणा पासून थांबाऊ शकलो.फा.जोश कोनापली,श्री.रुपेश इंगळे प्रकल्प समन्वयक,मंगेश येवले सुप्रवायझर श्री.शिताराम,रामदास,संजू,कृष्णा,मंगल,गणेश,नितीन,अमोल, सोणकलाल यांचे सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Previous Post Next Post