विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याकरिता भाजपा विद्यार्थी आघाडी नांदुरा चा जळगांव जामोद डेपो वर दणदणीत मोर्चा...


नांदुरा ता.प्रतिनिधी:-

दिनांक ०६/१०/२०२१ वार बुधवार रोजी जितू भाऊ मोरे भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हा सरचिटणीस, बुलढाणा जिल्हा यांच्या उपस्थितीत भाजपा विद्यार्थी आघाडी नांदुरा शहर अध्यक्ष आकाश म्हसने यांच्या वतीने जळगांव जामोद आगारा ला निवेदन देण्यात आले.कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाला असून माध्यमिक शाळा व महाविद्यालय तसेच शिकवणी वर्ग सुरु झालेले आहेत.शिक्षण ही विद्यार्थ्यांची गरज असून हक्क देखील आहे', प्रत्येक मुला-मुलींना शिक्षण मिळावं यासाठी भारत सरकारचे त्यासाठी अखंड प्रयत्न नित्य सुरुच असतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी प्राथमिक शिक्षण आपल्या गावातच पूर्ण करतात मात्र उच्च शिक्षणासाठी  व स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी त्यांना नाईलाजाने तालुक्याचं ठिकाण गाठावं लागतं.पण अश्या परिस्थितीत  बस 'बस थांबा' असूनही बस थांबत नाहीत, विद्यार्थ्यांनी  दि.२१/०९/२०२१  रोजी बस थांब्यावर बस थांबवा ' अशी विनंती आगार प्रमुखांकडे केली असता त्यांना आगार प्रमुखांकडून बस थांबवण्याचे आश्वासन मिळाले, परंतु तसे काही घडले नाही.म्हणून विद्यार्थ्यांनी २७/०९/२०२१ रोजी जळगाव गाठले परत विनंती केली.असता विद्यार्थ्यांना पुन्हा  बस थांबण्याचा जी. आर.  काढू असे आश्वासन देऊन  विद्यार्थ्यांना परत पाठवण्यात आले.दिनांक.०५/१०/२०२१ रोजी अत्यंत संतापजनक* घटना घडली.रोज  बस थांबत नाही आज बस थांबावी या अनुशंगाने  सुमारे २०-३० मुले-मुली रस्त्यावर आडवे झाले तरी बस चालकाने बस चा वेग कमी न करता मुलांच्या अंगावर बस आणली समयसूचकतेने मुले -मुली बाजूला झाले, बस चालकाला त्या निष्पाप विद्यार्थ्यांचा बळी घ्यावा वाटला की काय? कदाचित अश्याच कारणांमुळे ग्रामिण भागातील मुलींचे साक्षरतेचे प्रमाण कमी असेल का?असे प्रश्न येथे उद्भवतात.मुले खाजगी वाहना द्वारे नांदुरा आले व चालकास विचारपूस केली असता ' मला वाटले तर मी बस थांबवेल नाहीतर नाही ' असे उत्तर बस चालकाने दिले असे उत्तर शासकीय कर्मचारी देत असतील तर आम्ही भाजपा विद्यार्थी आघाडी व विद्यार्थी तुम्हाला जे उत्तर देतील  हे तुमच्या विचारपलीकडे असेल . आज निवेदन दिले यापुढे आम्ही निवेदन नाही जागेवरच निर्णय घेऊ असा इशारा देखील भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हा सरचिटणीस जितू मोरे यांनी दिला. गाडी क्र. MH-28 C-9498 वाहन चालकाचे नाव एस खान. या बस चालकावर कारवाई व्हावी व ग्राम मानेगाव येथे बस थांबावी असे निवेदन दिनांक. ०६/१०/२०२१, बुधवार रोजी जितू मोरे, भाजपा विद्यार्थी आघाडी  जिल्हा सरचिटणीस यांच्या उपस्थितीत व आकाश म्हसने भाजपा विद्यार्थी आघाडी शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आगार प्रमुखांना देण्यात आले.यावेळी  प्रकाश बावस्कार  (भाजपा विद्यार्थी आघाडी शहर सचिव),शिवराज फणसे (भाजपा विद्यार्थी आघाडी शहर सरचिटणीस),प्रथमेश शिंदे(उपाध्यक्ष भाजपा वि.आघाडी),शुभराज डंबेलकर(उपाध्यक्ष भाजपा वि.आघाडी),विशाल बारी(सहसचिव)वैभव महाले,जळगाव भाजपा विद्यार्थी आघाडी चे वैभव अढाव,किरतेश भाऊ अग्रवाल संकेत गई (विद्यार्थी) व असंख्य विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते...!!!.


______

Previous Post Next Post