चिखलदरा प्रतिनिधी:-
माऊली फिल्म व शिव छत्रपती बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था यांच्या वतीने दिला जाणारा 2021 चा आंतरराष्ट्रीय पुरस्कार राजु भास्करे यांना 31 आॅक्टोंबर ला सैराट फेम अभिनेता शेख अरबाज(सत्या) यांच्या हस्ते अकोला येथे होणाऱ्या पुरस्कार समारंभात देणारा येणार आहेत.राजु भास्करे हे अध्ययन समाचार व नवराष्ट वृत्तपत्राचे व RC24news चॅनल चे पत्रकार असुन यांनी कोरोना काळात मेळघाटातील अनेक बातम्या प्रकाशित केल्या होत्या. याच कार्याची दखल घेऊन त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला.