विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार उच्चशिक्षणाचे अभ्यासक्रम निवडा-अनिल जयस्वाल अध्यक्ष जळगाव शिक्षण मंडळ...


जळगाव जामोद प्रतिनिधी:-

उच्चशिक्षणाकरता  अभ्यासक्रम व कार्यक्षेत्राचि निवड करतांना पालकांची  भूमिका महत्त्वाची असते   मात्र तो निवडताना पालकांसोबतच विद्यार्थ्यांचा आवडीचा तसेच त्यांच्या कलागुणांना वाव देणारा अभ्यासक्रम व कार्यक्षेत्र निवडले पाहिजे असे मौल्यवान मार्गदर्शन  जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल यांनी दि.२०  ऑक्टोबरच्या संध्याकाळी शहरातिल दि. न्यु. इरा कनिष्ठ महाविद्यालय व हायस्कूलच्या सभागृहात आयोजित गुणगौरव कार्यक्रमात उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना केले.दि.न्यू.ईरा कनिष्ठ महाविद्यालय व हायस्कूलमधील इयत्ता दहावी व बारावीतिल गुणवंत विद्यार्थी सत्कार   व विशेष शिष्यवृत्ती वितरण   कार्यक्रमाचे   आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल होते तर या कार्यक्रमाला सचिव अनुप पुराणिक, सहसचिव मिलिंद जोशी , संचालक अभिजीत कुळकर्णी, अॅडव्होकेट शशिकांत गुप्ता,प्राचार्य तथा संचालक अविनाश कुलकर्णी, उपप्राचार्य शेख सलीम, पर्यवेक्षक  ओमप्रकाश चांडक व ओंकारराव तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती  .  सरस्वती पूजन व मान्यवरांच्या स्वागताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. गुणगौरव समारंभाचे प्रास्ताविक व यामधील विविध विशेष शिष्यवृत्ती तसेच बक्षिसे याबाबतची माहिती   प्राचार्य अविनाश कुळकर्णी यांनी दिली  . संस्थेचे सचिव अनुप पुराणिक यांनी सतत  यशस्वी होण्यासाठी  कठोर परिश्रम करण्याचे मौल्यवान मार्गदर्शन केले .  संस्थेतून इयत्ता दहावी व बारावीत उच्चतम गुणप्राप्त तसेच विविध विषयांमध्ये  प्रथम आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी व त्यांचे   पालक यांचा सत्कार करून त्यांना बक्षीसांचे वितरण करण्यात आले  . माध्यमिक स्तरातील विविध गुणवंत विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्तीचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले  .  या वेळी उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशामध्ये संस्थेचा महत्त्वाचा वाटा असून शालेय  जीवनात या शाळेने गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच सुसंस्कार दिल्याचे सांगितले  .  कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका सुजाता  बोंबटकार , निळकंठ राठोड ,गणेश आसेरकर व अभिजीत जोशी यांनी तर आभारप्रदर्शन केशव येवले यांनी केले.

Previous Post Next Post