भारताचे ऐतिहासिक यश, कोरोनाविरोधातील लसीकरणामध्ये गाठला १०० कोटींचा आकडा.जळगाव जामोद येथे साकारला १०० चा आकार...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

जानेवारी २०२० मध्ये भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर मार्च महिन्यापासून रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने देशव्यापी लॉकडाऊनला सुरुवात झाली होती. दरम्यान, १६ जानेवारी २०२१ पासून देशात कोरोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात झाली होती. त्यावेळी कोविड योद्धे असलेल्या आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांपासून लसीकरणाला सुरुवात झाली होती. १ मार्चपासून ६० वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यास सुरुवात झाली होती. तर १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील व्यक्ती आणि १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले होते.दरम्यान, कोरोनाच्या लसीबाबतच्या अफवा, शंका आणि लसींचा तुटवडा यामुळे या लसीकरण मोहिमेत अनेक अडथळे आले.मात्र या अडथळ्यांवर मात करत देशात लसीकरण मोहीम सुरू राहिली. देशातील कोरोनाविरोधातील लसीकरणासाठी मुख्यत्वेकरून कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींचा वापर केला गेला. ऑगस्ट महिन्यापासून कोरोनाविरोधातील लसीकरणाचा वेग वाढला. तसेच काही वेळा दिवसाला १ कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्याचा विक्रम नोंदवला गेला. दरम्यान,दिनांक २१ ऑक्टोबर रोजी कोरोना लसीकरणामध्ये १०० कोटी  लसीकरणाचा ऐतिहासिक टप्पा भारताने गाठला आहे. त्याच अनुषंगाने भारतीय जनता युवा मोर्चा बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने जळगाव जामोद येथे देशाचे यशस्वी प्रधानमंत्री विकासपुरुष नरेन्द्र मोदी यांच्या संकल्पने मधुन व कोरोना काळात ज्यांनी काम केले ते सर्व कोरोना योध्ये यांच्या अथक परिश्रमाने व मेहनतीमुळे आज 100 कोटी नागरिकांचे लसीकरण पुर्ण झाल्याबद्दल मनपुर्वक आभार भाजयुमो बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने मा. मोदीजी यांचे मानण्यात आले.या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे होते की भाजयुमोचे कार्यकर्ते शंभर कोटी लसीकरण झाल्या मुळे शंभरच्या आकड्यांमध्ये उभे होते.याकार्यक्रमात भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्री.सचिन देशमुख जिल्हा उपाध्यक्ष श्री.रामभाऊ इंगळे भाजयुमो तालुका अध्यक्ष श्री.परीक्षित ठाकरे शहर श्री.उमेशभाऊ येऊल ,माजी शहर अध्यक्ष श्री.अजय वंडाळे विद्यार्थी आघाडीचे जिल्हा सरचिटणीस श्री.वैभव अढाव जिल्हा उपाध्यक्ष श्री.किर्तेश अग्रवाल यांच्या सह भारतीय जनता युवा मोर्चाचे व विद्यार्थी आघाडी चे कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Previous Post Next Post