वरणगाव प्रतिनिधी:- सुनील पाचपोळ
दि.05/10/2021 रोजी वरणगाव पोलीस स्टेशन हॉलमध्ये हद्दीतील नवदुर्गा मंडळाचे अध्यक्ष,पदाधिकारी व कार्यकर्ते पोलिस पाटील यांची संध्याकाळी 18.00 वाजेचे दरम्यान मिटींगचे आयोजन केले. होते सदर मिटिंगमध्ये आगामी नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने शासनाने तसेच मा. जिल्हा धिकारी सो जळगाव,मा पोलीस अधीक्षक सो. जळगाव यांनी निर्गमित केलेले आदेश व मार्गदर्शक सूचना समजावून सांगून नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे बाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नवदुर्गा स्थापना व विसर्जन बाबत कुठल्याही प्रकारची मिरवणूक निघणार याबाबत सक्त सुचना देण्यात आल्या. यावेळी आशिष आडसूळ सहाय्यक पोलीस निरीक्षक वरणगाव पोलीस स्टेशन यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल येवले प्रशांत ठाकूर होमगार्ड दीपक वाणी यांनी परिश्रम घेतले
 
