प्रधानमंत्री फळ पिक विमा योजना विमा उतरविण्यासाठी मुदत वाढ करा, खासदार रक्षाताई खडसे यांचे, कृषिमंत्री, कृषि सचिव व पालकमंत्री यांच्याकडे मागणी....


 वरणगाव प्रतिनिधी - सुनिल पाचपोळ

चालू वर्षाच्या प्रधानमंत्री फळ पिक विमा योजनेत* सहभागी होण्यासाठी विनाकर्जदार शेतकऱ्यांकरिता विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत दि. ३० ऑक्टोबर निर्देशित केली आहे. पिक विमा उतरविण्यासाठी ७/१२ उताऱ्याची आवश्यकता असून, शेतकऱ्यांना शेतीचा ७/१२ उतारा मिळणेसाठी तलाठी संघाच्या कामबंद आंदोलनामुळे अडचणी येत आहे, त्यासाठी फळ पिक विमा योजनेची मुदत वाढ करावी यासाठी *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी *कृषिमंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, कृषि सचिव एकनाथ डवले व जिल्हाधिकारी जळगांव* यांना पत्रव्यवहार करून मागणी केली आहे.मागील काही दिवसांपासून *तलाठी संघाने कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन* सुरु असून केळी पिक विमा उतरविण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी मुख्यत: केळी उत्पादक शेतकऱ्यांची धावपळ सुरू असुन तलाठ्यांच्या संपामुळे, शेतकऱ्यांना शेताचा ७/१२ उतारा मिळण्यास अडचणी येत आहेत. केळी पिक विमा उतरविण्याची ३० ऑक्टोबर मुदत संपण्यात असुन, शेताच्या उताऱ्या अभावी शेतकरी केळी पिक विमा लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्याबाबत शेतकऱ्यांना उतारा मिळणेसाठी पर्यायी व्यवस्था करणे बाबत कार्यवाही करणेसाठी जिल्हाधिकारी जळगांव यांना आधीच पत्रव्यवहार करून सूचना केलेल्या आहे. आधीच अवकाळी पाऊस व जोरदार वादळाचे संकट असुन, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये याबाबत खासदार रक्षाताई खडसे यांनी निवेदनात म्हटले.अद्याप असंख्य शेतकऱ्यांनी अजून प्रधानमंत्री फळ पिक विमा योजना अंतर्गत विमा उतरविलेला नाही, तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सदर प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होऊन लाभ घ्यावा, यासाठी *कृषिमंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, कृषि सचिव एकनाथ डवले व जिल्हाधिकारी जळगांव* यांनी आपआपल्या स्तरावरून विमा हप्ता भरण्याच्या अंतिम मुदतीत वाढ होणेसाठी तत्काळ कार्यवाही व्हावी असे विनंती यावेळी *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी केली.

Previous Post Next Post