मेळघाट विधानसभा क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या धारणी व चिखलदरा तालुक्यात मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे सोयाबीन, तूर, ज्वारी, मका, भुईमूग, यांसारखी पिके पाण्याखाली गेली असुन मेळघाट मधील नागरीकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे मेळघाट मधील धारणी व चिखलदरा तहसिल अंतर्गत येणाऱ्या शेकडो हेक्टर जमिनीवरील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या तोंडापाशी आलेला घास हा अतिवृष्टीमुळे हरवल्याचे दिसून येते तरीसुद्धा महसूल व कृषी विभागाने पंचनामे न केल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.शेकतकऱ्यांचे नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करुन तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी याकरीता आज उपविभागीय अधिकारी धारणी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी मेळघाट विधानसभेचे माजी आमदार केवलरामजी काळे, रमेश धांडे, राजु जावरकर, गणेश कास्देकर, नंदलाल जावरकर, धिरज मालविय, बुडा भिलावेकर, राजेश हाडगे आदि शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करा.माजी आमदार केवलराम काळे यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
