अजगरराची चरबी काढणाऱ्या चौघाना वनविभागाने घेतले ताब्यात...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

धारणी पासून जवळच खाऱ्या टेम्भूरू गावातील चार लोकांनी अजगरला मारून त्यांच्या अंगावरील चरबी काढल्याचा प्रताप केला असता वनविभागाला माहिती मिळताच धारणी येथील वनविभागाच्या पथकाने चौकशी करून चार लोकांना ताब्यात घेतले.पश्चिम मेळघाट वनविगाअंतर्गत धारणी वनपरीक्षेत्रातील धारणी वर्तुळातील खाऱ्या बिट मधील खाऱ्या तें सोनाबर्डी रस्त्यावरील शिलाफाटा नाल्याजवळ खाऱ्या टेम्भूरू येथील रहिवासी चार लोकांनी मिळून एक अजगाराला मारून त्याच्या अंगावरील चरबी काढल्याची माहिती एसीएफ पवन चेप यांना मिळताच धारणी वनपरीक्षेत्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांना घेऊन घटना स्थळ गाठले नवं कसून चौकशी केल्यावर खाऱ्या टेम्भूरू येथील चौघाना ताब्यात घेतले. अटक असलेल्या चारही आरोपीना धारणी न्यायालयात उभे करून एफ सी आर ची मागणी केली आहे.

Previous Post Next Post