बांगलादेशात हिंदूवर होत असलेल्या हल्ल्याबाबत भारत सरकारने त्वरित उपाययोजना करावी विश्व हिंदू परिषद,बजरंग दल चे निवेदन...


जळगांव जा.प्रतिनिधी:-

मागील काही काळापासून बांगलादेशामध्ये हिंदू परिवार तसेच धार्मिक स्थळे, दुर्गा पुजा मंडपावर बांगलादेशातील कट्टरपंथीय जिहादी संघटना आणि स्थानिक लोकांकडून तेथे अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू व शीख बांधवांवर अन्याय-अत्याचार हल्ले, महिलांवर बलात्कार तसेच धार्मिक विटंबना सतत होत आहेत त्याबाबत बांगलादेश सरकार तेथील जिहादी प्रवृत्तीला  समर्थन देत असल्या सारखे कृत्य करीत असल्याचे संपूर्ण जगात स्पष्ट झाले आहे. त्यादृष्टीने भारत सरकारने बांगलादेशाच्या सरकारवर जागतिक दबाव निर्माण करून तेथील अल्पसंख्यांक हिंदू व शीख बांधवांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी आवाज उठवावा तसेच जागतिक स्तरावर बांगलादेशातील सरकारला शांततेचा मारक आणि दहशतवादी देश म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा अशी मागणी विश्व हिंदू परिषद बजरंग दल मातृशक्ती दुर्गा वाहिनी व समस्त भारतीय हिंदू समाजाकडून करण्यात येत आहे अशा आशयाचे निवेदन विश्व हिंदू परिषद व बजरंग दल जळगाव जामोद च्या वतीने दिनांक 20 ऑक्टोंबर रोजी जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्यामार्फत भारताचे राष्ट्रपती यांना देण्यात आले आहे. सदर निवेदन देतेवेळी नंदकिशोर दलाल जिल्हा संयोजक, ज्ञानेश्वर कराळे प्रखंड संयोजक.रितेश डोबे नगर संयोजक, पवन उपाध्याय, ज्ञानेश्वर कोथळकर, उमेश थोरात, संजय खुपासे, सुनील कुवारे, शुभम उमाळे,मनोज माकोडे,संदिप परमाळे,मंगल ढगे,सुरज गावंडे,सोहम मोरखडे,राम कड,प्रतिभा राखोंडे यांच्यासह बहुसंख्य पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

Previous Post Next Post