जळगांव जा.प्रतिनिधी:-
राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते, अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री नामदार राजेंद्रजी शिंगणे, जिल्हाध्यक्ष ऍड. नाझेरजी काझी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन, प्रदेश सरचिटणीस तथा पणन महासंघ संचालक प्रसेनजीत पाटील यांच्या शुभहस्ते स्वाभिमानी युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष अनिल असंबे तसेच मंगेश बाजारे, प्रतीक देशमुख, रोशन पवार, अमर देशमुख, नितीन धुमाळ, अभिषेक दाभाडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी शहराध्यक्ष अब्दुल जहीर, तालुका कार्याध्यक्ष एम.डि.साबीर, माजी नगरसेवक संजय देशमुख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख स्वप्निल पाटील, मोसिन खान, आशिष वायझोडे, निजाम राज, निखिल पाथ्रीकर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.