स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगाव काळे येथे तहसीलदार शितल सोलाट यांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मोफत डिजिटल सातबारा वाटपाचा शुभारंभ संपन्न...



 मंगल काकडे/पिंपळगाव काळे प्रतिनिधी.

कृषी क्षेत्रात डिजिटल प्रणाली वाढवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारही प्रयत्न करीत आहे. कारभारात नियमितता आणि योजनांचा थेट लाभ हा त्यामागचा उद्देश आहे. विविध माध्यमातून शेतकऱ्यांच्या समोर डिजिटल प्रणाली आणली जात आहे. याचाच एक नमुना म्हणून आता डिजिटल स्वाक्षरीत सुधारित सातबारा थेट शेतकऱ्यांच्या हाती पडावा यासाठीची मोहीम राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता गावात किंवा तालुक्याच्या ठिकाणी हा डिजिटल सातबारा शेतकऱ्यांना मिळणार आहे. गावस्तरावर ग्रामसभांमध्ये याचे वाटप केले जाणार आहे. व याची सुरुवात व पहिला शुभारंभ दिनांक.०२/१०/२०२१ रोजी शनिवार ठीक सकाळी १० वाजता तालुका जळगाव जामोद येथील पिंपळगाव काळे येथे संपन्न झाला. व सर्वप्रथम मान्यवरांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजि पंतप्रधान लालबहादूर शास्त्री या दोन्ही प्रतिमेला हार घालून अभिवादन केले.





व सातबारा वाटपाला सुरुवात करण्यात आली.पिंपळगाव काळे भाग १ व २ मधील शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा वाटपाला सुरुवात तहसीलदार शितल सोलाट मॅडम यांच्या हस्ते शेतकऱ्यांना पहिला डिजिटल सातबारा देण्यात आला. तसेच नायब तहसीलदार संजय मार्कंड साहेब.प्रकाशभाऊ पाटील.बंडूभाऊ पाटील.आशाताई कळसकार सरपंच.यशोदाताई घटे उपसरपंच. ग्रामपंचायत सदस्य या सर्वांच्या हस्ते शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा एकदा निशुल्क मोफत वाटप करण्यात आला आहे.पिंपळगाव काळे येथे शुभारंभ करण्याचे कारण हे की पिंपळगाव काळे या मंडळामध्ये आणि या गावांमध्ये याप्रकारच्या सातबाराचे काम चांगले झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी भाग १ व २ मध्ये अशा १५ १५ शेतकऱ्यांना निशुल्क स्वरूपामध्ये मोफत सातबारा वाटप करण्यात आलेला आहे. उर्वरित सर्व शेतकऱ्यांनी या मोहिमेमध्ये सहभागी होऊन आपले हे काम शंभर टक्के पूर्ण होईल याप्रमाणे प्रशासनाला सहकार्य करावे असे मी तहसीलदार म्हणून सर्व ग्रामवासी यांना विनीत करते.व तलाठी मेजर विजय मोहटे भाग १ व तलाठी सारंग वावटलीकर भाग २ या दोघांने उत्कृष्ट काम केलेले आहे. त्याच प्रमाणे ई पीक पाहणी हे काम सुद्धा गावामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये पिंपळगाव काळे या गावांमध्ये सर्वात जास्त झाले आहे. व ते ७० टक्के झाले आहे. त्यामुळे उर्वरित ३० टक्के शेतकरी आहे यांनी सुद्धा हे काम पूर्ण पणे लवकरात लवकर करून १००% काम करणार पहिल गाव या तालुक्यातलं म्हणून गाव व नाव लोवकीत मिळावा असे मी आवाहन करते. व शेवटी तहसीलदार मॅडम यांनी तलाठी विजय मोहटे साहेब.व तलाठी सारंग वावटलीकर साहेब या दोघांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तहसीलदार मॅडम यांच्या हस्ते या दोघांचा सत्कार करण्यात आला. व सर्वांच्या हस्ते पण सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थितांमध्ये. प्रकाश भाऊ पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष. बंडूभाऊ पाटील विरोधी पक्षनेते जिल्हा परिषद बुलढाणा. आशाताई कळसकार.सरपंच. यशोदाताई घटे.उपसरपंच. ग्रामसेवक ढगे साहेब. ग्रामपंचायत सदस्य. अजय ताठे. भारती बांगर. प्रीती तायडे. सचिन जाधव. विनोद बहादरे. अर्चना हरमकार. विलास मांडोकार. अशोक ढोले. राधिका राऊत. नवल गोतरकार. नवलसिंग मावळे. दुर्गा मांडोकार. शेख हारून. उषा चोखंडे. वंदना निकम. हरी वाघमारे.श्रीकृष्ण गवई. किशोर घटे. सुधाकर घटे. बंटी कळसकार.मनू पाटील. सुपडा पाटील. मयूर राऊत.योगेश जाधव.अमित जाधव.अजय काळे. उमेश मांडोकार. सुरेश चोखंडे.व मोठ्या संख्येने गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

Previous Post Next Post