समाजकार्य महाविद्यालय बडनेरा,अमरावती येथून 'क्लीन इंडिया' अभियानाला सुरुवात...


 राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी.

बातमी संकलन:-मंगल काकडे. बुलढाणा जिल्हा...

२ ऑक्टोबर विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटी अमरावती द्वारा  संचालित, समाजकार्य महाविद्यालय बडनेरा, अमरावती येथे दिनांक २ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १०:०० वाजता 'राष्ट्रीय सेवा योजना' विभागामार्फत "राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त "क्लीन इंडिया अभियान" राबविण्यात आले आहे.या अभियाना अंतर्गत  महाविद्यालयाच्या परिसरात "स्वच्छता अभियान" राबविण्यात आले आहे.सदरील कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.राजकुमार दासरवाड,कार्यक्रम अधिकारी-राष्ट्रीय सेवा योजना, समाजकार्य महाविद्यालय बडनेरा, अमरावती यांनी केले. 



भारताचे पंतप्रधान माननीय. नरेंद्रजी मोदी  यांच्या नेतृत्वाखाली "क्लीन इंडिया अभियान" संपूर्ण भारतात राबविण्यात येत आहे.त्यानुसार राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत अमरावती जिल्ह्यातील शहरात भागात आणि ग्रामीण भागात प्रत्येक्ष गावामध्ये जाऊन दिनांक २ ऑक्टोबर २०२१ पासून ते ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत हा अभियान राबविण्यात येणार आहे. अशी सविस्तर माहिती डॉ. राजकुमार दासरवाड यांनी दिली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य डॉ.दिलीप काळे संचालक-संत गाडगेबाबा अध्यासन केंद्र, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती यांनी उपस्थित राहून राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. क्लीन इंडियाची सुरुवात 'राष्ट्रीय सेवा योजना कार्यालय व महाविद्यालय परिसरात' स्वतः झाडू घेऊन स्वच्छता अभियानाला सुरुवात करून अभियानाचे उदघाटन केले. या अभियानात महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापक डॉ. विशाल गजभिये, समन्वयक-आय.कीव.ए.सी. समिती यांची विशेष उपस्थिती होती. सदरील अभियान यशस्वी होण्यासाठी श्री.महेश गभने,श्री. विजय बागडे, श्री. रुपेंद्र आत्राम इत्यादी शिक्षेकत्तर कर्मचाऱ्यांनी सदरील अभियानात सहभाग घेऊन अभियानाची शोभा वाढवली. तसेंच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक कु. ईशा मेश्राम, कु. दिक्षा शेंडे, कु. साक्षी भांगे, कु. ईशा लंगडे, कु.निकीता उंबरकर, कु.वैष्णवी पाली,कु.शगुन पांडे, राहुल विंचुरकर, अनिकेत इंगळे, रोशन डफाळे इत्यादींनी विशेष मेहनत घेऊन महाविद्यालय परिसर स्वच्छता करून महाविद्यालयाची शोभा वाढवली आहे. कार्यक्रमाचे आयोजनराष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. राजकुमार दासरवाड यांनी केले तर अभियानात सहभाग झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार प्रदर्शन कु दीक्षा शेंडे यांनी केले.

Previous Post Next Post