जळगांव जा.प्रतिनिधी:-
पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना आता ताबडतोब मिळावी म्हणून जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी मंत्रालयात आंदोलन केले होते. 15 सप्टेंबरला झालेल्या या आंदोलनात शासनाने पंधरा दिवसांची मुदत मागितली होती. यानंतर कोणताही तोडगा न निघाल्यास उग्र आंदोलन करण्याची धमकी डॉक्टर कुटे यांनी शासनाला दिली होती. आज याबाबत मंत्रालयातुन परिपत्रक निघून येत्या पाच आक्टोंबर रोजी कृषी मंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पिक विमा संदर्भात निर्णय घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीला बैठकीत बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमाचा प्रश्न चर्चिला जाणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि आमदार संजय कुटे या दोघांनाही या बैठकीत आमंत्रित करण्यात आल्याची माहिती मिळाली असून या बैठकीत पिक विमा शेतकऱ्यांना मिळण्यासाठी काहीतरी सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
