धारणी तालुक्यातील अतीदुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोलाई येथील रमेश फड यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत झालेल्या शौचालय बांधकाम भ्रष्टाचार मधील दोषीवर तात्काळ चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. 6 ऑक्टोबर पूर्वी दोशीवर कार्यवाही न झाल्यास 6 ऑक्टोबर पासून अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा निवेदना द्वारे गटविकास अधिकारी महेश पाटील यांना व शासकीय यंत्रनेला दिला आहे.ग्रामपंचायत गोलाई अंतर्गत शौचालय बांधकाम करण्यात आले. त्याचे पैसे एका ठेकेदारच्या नावे काढण्यात आले.या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार अनेकदा गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.त्यामध्ये शासकीय नोकरवर्ग असलेल्या लोकांच्या नावे अनुदान काढले आहे. तसेच एकच व्यक्तीच्या नावे अनेकदा अनुदान काढले आहे.याबाबत अनेकदा गटविकास अधिकारी पंचायत समिती धारणी व मुख्य कार्यपालन अधिकारी जि प. अमरावती यांचे कडे तक्रारी दिल्या तरीसुद्धा त्याची चॊकशी न करता संबधितावर कार्यवाही झाली नाही. म्हणून रमेश फड यांनी या निवेदनाद्वारे संबधित कामाची चौकशी करून दोषीवर त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.6 ऑक्टोबर पूर्वी कार्यवाही न झाल्यास धारणी तहसील समोर अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचे त्यांनी शासनाला दिलेल्या पत्रात कळविले आहे.
रमेश फड यांचा अन्नत्याग आंदोलनाचा इशारा...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
