दि अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निवडणूक करीता गेल्या दोन महिन्यांपासून एक सारखे मतदाताच्या घरी उमेदवाराला चकरा माराव्या लागल्या असून या निवडणुकला ५ तारखेला पुर्णविराम मिळाले आहे.त्याच प्रमाणे चिखलदरा तालुक्यातील जिल्हा बँके करीता उमेदवार म्हणून काँग्रेस कडून दयाराम काळे तर प्रहार कडून शभुंजी खडके हे होते. चिखलदरा येथील जिल्हा बँकेत शभुंजी खडके हे निवडून आले पाहिजे म्हणून प्रहार चे आमदार व राज्यमंत्र्यांनी खुप जोर लावले असून अखेर त्यांना मेळघाटचा वाघ दयाराम काळे यांच्या समोर हार मानावे लागले जिल्हा बँके करीता १६ मतदाता असून दयाराम काळे यांना ९ मते मिळाली तर शभुंजी खडके यांना ६ मते मध्येच समाधान मानावे लागले.या निवडणुकीत विशेष मोलाचा वाटा म्हणून जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गैलवार, राहूल येवले, विनायक येवले, संजु बेलकर यांचा राहीला आहे.
जिल्हा बँकेत मेळघाटचा वाघ दयाराम काळे यांचा दणदणीत विजय...
 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
 
