धारणी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाची कु. मनीषा मुरले ह्या विध्यार्थिनीला महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रीय सेवा योजना कोरोना पुरस्काराने 1 ऑक्टोबर2021 रोजी श्री संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे आयोजित समारंभात सन्मानित करण्यात आले.कोविड 19 महामारीच्या काळात सदर विध्यार्थिनीने राष्ट्रीय सेवा योजना च्या स्वयंसेवकांना प्रोत्साहित करणारी यशोगाथा तयार केल्याबद्दल राष्ट्रीय सेवा योजना 2020 चा कोरोना योद्धा पुरस्कार उदयनजी सावंत उच्च व तंत्र शिक्षा मंत्री यांच्या हस्ते विधार्थीनीला प्रदान करण्यात आले.संपूर्ण देशात लाकडाऊन लागले असताना त्या काळात वसंतराव नाईक महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विध्यार्थ्यानी सतत महिनाभर पोलीस मित्र म्हणून काम केले. तसेच या काळात शासनाला सामाजिक कार्यात भरीव सहकार्य केले व समाज जागृतीचे कार्य केले.म्हणून या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने सदर पुरस्कार जाहीर केला.अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा महिला व बालकल्याणमंत्री यशोमतीताई ठाकूर, शिक्षक मतदार संघांचे आमदार किरणजी सरनाईक व संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मालखेडे,डॉ राजेशजी बुरांगे संचालकश्री संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती डॉ प्रभाकर देसाई राज्य जनसंपर्क अधिकारी रा.से.यो.यांनी कु.मनीषा मुरले हिचे अभिनंदन केले.महाराट्र शासनाचा रासेयो कोरोना योद्धा पुरस्कार प्राप्त कु. मनीषा मुरले हिला यशस्वीतेकरिता महावीद्यालयातील रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.विकास देशमुख, व महाविद्यालयच्या प्राचार्या चित्रलेखा देशमुख यांच्या प्रोत्साहनामुळे, महिला कार्यक्रम अधिकारी कु. इंगोले व सह कार्यक्रम अधिकारी अहमद शेख यांनी अथक प्रयत्ननाणे शक्य झाले.दयाराम पटेल ट्रस्ट चे मार्गदर्शक व समाजसेवक मा. नानासाहेब भिसे, संस्थेच्या अध्यक्षा सौं. विनाताई मालवीय, उपाध्यक्ष प्रदीप भिसे सदस्य रमेशजी मालवीय,सचिव रमेशजी जिराफे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी सर्वांनी मनिषाचे कौतुक व अभिनंदन केले.
वसंतराव नाईक महाविद्याल्याची मनीषा मुरले महाराष्ट्र शासनाचा रासेयो. पुरस्काराने सन्मानित...
 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 
 
