पीक विम्याची तुटपुंजी रक्कम मिळाल्या बद्दल पिंपळगाव काळे सर्कल मधील शेतकऱ्यांचे जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते बंडू पाटील यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन....


 पिंपळगाव काळे प्रतिनिधी:-मंगल काकडे.

पिंपळगांव काळे सर्कलमधील सोयाबीन व इतर पिक उत्पादक शेतकऱ्यांनी  सन 2020 मध्ये पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत  सोयाबीन पिकाचा पिकविमा काढला होता. नुकसानीचे प्रमाणनुसार पिंपळगाव सर्कल मधील शेतकऱ्यांची 100% नुकसान भरपाईची रक्कम विमा कंपनीकडून मिळणे अपेक्षित असून एकरी 1200/- रू. इतकी तटपुंजी रक्कम पिंपळगाव काळे सर्कल मधील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकतीच जमा केली असून एकप्रकारे शेतकऱ्यांची विमा कंपनीने थट्टाच केली आहे. वास्तविक पिंपळगांव काळे सर्कलला लागूनच असलेल्या वडशिंगी सर्कलमध्ये पिकविम्याच्या रक्कम एकरी 10 ते 12 हजार रू. दिली आहे. तसेच पिंपळगांव काळे सर्कल मधील यापुर्वी ऑनलाईन तक्रार करणाचा काही शेतकरी बांधवांच्या खात्यावर एकरी 6000रू. प्रमाणे विमा मिळाला आहे. अशा प्रकारे पिकविमा भरपाई रक्कम वाटप करतांना विमा कंपनीने नाहक भेदभाव केला आहे. यावरून पिंपळगाव सर्कल मधील शेतकऱ्यांचा सोयाबीन पिकाच्या नुकसानी बाबतचा कृषी विभाग, महसुल विभाग व विमा कंपनी प्रतिनिधी यांनी चुकीचा अहवाल सादर केला असावा त्यामुळे केवळ पिंपळगांव काळे मंडळातील शेतकऱ्यांना अत्यंत तटपुंजी पिकविमा नुकसानीची रक्कम मिळाली आहे. तरी आम्हाला पीक विम्याची संपूर्ण नुकसान भरपाई देण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे. सदर निवेदन जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते बंडू पाटील यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले. या निवेदनावर जिल्हा परिषद विरोधीपक्ष नेते बंडू पाटील, डॉक्टर प्रशांत राजपूत ,कृष्णकांत सातव, प्रवीण ताठे, श्रीकांत महाले, निलेश भोपळे ,मंगेश भोपळे, गणेश मानकर ,रामदास भोपळे, रतन उमाळे, सोपान अवचार ,रामदास वानखडे इत्यादी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

Previous Post Next Post