गोवा येथे झालेल्या नॅशनल चॅम्पियन शिप स्पर्धेत वडशिंगी येथील निखिल भीमराव भगत राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम. गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आला सत्कार..


जळगांव जा.प्रतिनिधी:-


जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी येथील अतिशय सामान्य कुटुंबातील निखिल भीमराव भगत याने गोवा येथील दोनशे मीटर रनिंग स्पर्धेमध्ये राज्यस्तरावरून प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल त्याचा गोल्ड मेडल देऊन सत्कार करण्यात आला. ही स्पर्धा राष्ट्रीय युवा क्रीडा आणि शिक्षण महासंघ, इंडिया ऑर्गनायझेशन कमिटी इंडिया ही एक क्रीडा संस्था आहे ज्याचा मुख्य उद्देश खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये खेळायला मिळवणे आणि त्यातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार करणे आहे. यासाठी संस्थेमार्फत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जातात. या संस्थेच्या माध्यमातून खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचा अनुभव मिळतो आणि खेळाडूचा सर्वांगीण विकास होतो. ही स्पर्धा गोवा येथे आयोजित करण्यात आली होती यामधून दोनशे मीटर रनिंग या स्पर्धेमध्ये वडशिंगे येथील निखिल भिमराव भगत याने राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल त्याला गोल्ड मेडल मिळाले. या विजया बद्दल वडशिंगी येथील रमाई महिला मंडळ तसेच गावकऱ्यांच्या वतीने निखिल भगत यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वडशिंगी येथील ग्रामपंचायत सदस्य नितीन भगत, निखिल ची आई ललिता भगत, लक्ष्मीबाई भगत, सुमन भगत भास्कर भगत,सिंधु भगत निलेश भगत यांच्यासह बहुसंख्य गावकऱ्यांची निखिलच्या सत्काराला उपस्थिती होती.
Previous Post Next Post