बोले तैसा चाले.. सामाजिक कार्यकर्ते प्रमोद भंसाली यांनी दिला चारबन शाळेला L.E.D.भेट...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगांव जा तालुक्यातील डोंगराळ,दुर्गम भागातील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा चारबन ला जळगांव जा येथील पी.एम.मॉल चे संचालक प्रमोदसेठ भन्साली यांनी LED स्मार्ट टीव्ही भेट दिली.विविध उपक्रम राबवणारी आदिवासी भागातील चारबन शाळा iso मानांकित व डिजिटल शाळा करायची असून त्यासाठी मदत करण्याचे आवाहन चारबन शाळेतील शिक्षकांनी विविध प्रसार माध्यमावर केले आहे.त्याला प्रतिसाद देत नुकतेच साईमंगल गारमेंट चे संचालक अमोलसेठ सौदागर यांनी चारबन शाळेला पंखे,इन्व्हर्टर, बॅटरी भेट दिली त्या कार्यक्रमात प्रमोदसेठ भन्साली यांनी शाळेला LED भेट देण्याचे आश्वासन दिले होते.त्या आश्वासनाची पूर्तता करीत 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले'या म्हणीप्रमाणे भन्साली यांनी चारबन शाळेला LED भेट दिली.शाळेला भेट देऊन आदिवासी भागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचे त्यांनी कौतुक केले व खरोखर शाळेला मदतीची गरज असल्याने मदत केल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी दिल्या.

Previous Post Next Post