सुजातपुर येथे महिला ग्रामपंचायत सदस्याचा विनयभंग 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल .आरोपी मध्ये राष्ट्रवादीच्या च्या नेत्यांचा हि समावेश.


बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सुरज देशमुख 

जलंब पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सुजातपुर ग्रामपंचायत च्या एका महिला सदस्य चे विनयभंग करून तिच्या पती व मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत जलम पोलीस सूत्रांकडून मंगळवार दिनांक 28 डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजे दरम्यान देण्यात आलेल्या माहितीनुसार सुजातपूर ग्रामपंचायत ची सभा 27 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती.यावेळी सभेमध्ये उपस्थित महिला सदस्याने ग्रामपंचायत कडे निधी असेल तर आमच्या घरामागच्या पाइपलाइन फुटलेली आहे. त्याची दुरुस्ती करा असे म्हटले असता आरोपींनी तू मधात बोलू नको तू कशाला मध्ये बोलते तू मागून आली असे म्हणून वाद घातला या वेळी माझे पती माझ्या मुलाला घेऊन मला घेण्यासाठी आले असता मला तसेच माझ्या मुलास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. माझ्या पती सुद्धा मारहाण करण्यात आली. आरोपींनी मला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आणि विनयभंग केला अशा तक्रारीवरून आरोपी मनोज हरिभाऊ धुरंधर यांच्यासह पत्नी तसेच योगेश रवींद्र धुरंधर, गोपाल पांडुरंग तायडे, अंबादास देविदास शिंगणे अधिक एक महिला असे सहा जणांविरुद्ध कलम 354, 324, 143 147 148 149 294 341 323 506 भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असल्याचे समजते त्यामुळे या प्रकरणी पोलिसाकडून काय कारवाई करण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे‌ .

Previous Post Next Post