जळगांव जा.प्रतिनिधी:-
जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगांव येथील शौचालय चोरी झाल्याचा प्रकार विविध माध्यमांनी समोर आणल्यावर सुद्धा आज पर्यंत जळगाव जामोद पंचायत समिती गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकडे यांनी त्या चोरी गेलेल्या शौचालयाची साधी पाहणी करून किंवा संबंधित ग्रामसेवक यांची चौकशी सुद्धा न केल्याने वरिष्ठांचे सुद्धा या प्रकरणात हात तर नाही ना?अशी चर्चा तालुक्यात होतांना दिसत आहे.या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपी असणाऱ्या व्यक्तीवर जळगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी दिनांक 28 डिसेंबर रोजी रीं.पा. ई.चे बुलढाणा युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत तायडे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.गेल्या काही दिवसा पासून झाडेगांव येथील एकनाथ फकिरा सोळंके यांचे शौचालय चोरी गेले आहे असे प्रसिध्दी माध्यमातुन समोर आले. झाडेगाव ग्रा.पं.ला महिला सरपंच असल्याने विविध योजना राबविणे हे सचिव म्हणुन सचिवाच्या कामाचा भाग आहे. झाडेगांव येथील शौचालय चोरीला गेल्याची बाब सत्य तर आहेच उलट या प्रकरणात आम्ही माहिती घेतली असता यापेक्षाही मोठी चोरी शौचालय योजनेत झाली असून केंद्राच्या योजनेस हरताळ येथील सचिवांनी फासली आहे. असे तक्रारदार यांनी निवेदनात नमूद केले आहे.या शिवाय झाडेगांव येथील सन २०१९-२० ते आता पर्यंत झालेले शौचालय, व त्यांना देण्यात आलेले अनुदान, लाभार्थी निवड, लाभार्थी पात्रता, कर्ता बदलुन परत लाभ देणे हे प्रकार सुध्दा बाहेर येत आहे.या मध्ये जागा कुणाची, शौचालय कुणाचे, निधी कोणाला, अश्या प्रकारे शौचालय अनुदानात मोठा भ्रष्टाचार झाला असून त्याची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.या भ्रष्टाचारात वरिष्ठ अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांना पाठीशी घालु नये कारण प्रसिध्दी माध्यमातुन बातम्या येवुनही आपण साधी चौकशी केली नाही त्यामुळे १२,०००/- रू. अनुदान भ्रष्टाचारात आणखी अधिकारी सहभागी नाही ही बोलण्याची वेळ आज सामान्यात होत आहे.शौचालय चोरी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषीवर गुन्हे दाखल करावे जेणेकरून शासनाच्या योजना प्रामाणिकपणे राबविल्या जातील. सरपंच यांच्या अज्ञान पणाचा फायदा तर सचिचाकडून घेतल्या जात नाही हे ही तपासावे व झाडेगांवची झालेली नामुष्की दुर करावी अशी मागणी रिपाइंचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत तायडे यांनी निवेदनात केली आहे.