भंडारा येथून जवळच असलेल्या पहेला येथील सामाजिक कार्यकर्ते संजीव मुरारी भांबोरे यांचे साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बघून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे नागपूर विभागीय अध्यक्ष सतीश सोमकुवर यांनी राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे ,विदर्भ अध्यक्ष आनंदकुमार शेंडे यांच्या आदेशानुसार आज दिनांक 28 डिसेंबर 20 21 रोजी एका लेखी पत्रकाद्वारे संजीव भांबोरे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नागपूर विभागाच्या संपर्क प्रमुख पदी नियुक्ती केलेली आहे. त्यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय नागपूर विभागीय सरचिटणीस जयेंद्र चव्हाण ,नागपूर विभागीय प्रसिद्धीप्रमुख पंकज वानखेडे, भंडारा जिल्हा अध्यक्ष नाशिक चवरे ,यांना दिलेले आहे. संजीव भांबोरे हे सत्य पोलीस टाइम्स उपसंपादक, पी .टीव्ही. न्यूज चॅनल सहसंपादक, मुंबई वार्ताहर प्रतिनिधी ,सांजवार्ता प्रतिनिधी, दैनिक दंडाधिकार जिल्हा प्रतिनिधी ,दैनिक शिल्पकार जिल्हा प्रतिनिधी, अशा प्रिंट मीडिया ,पोर्टर ,युट्युब चॅनल, क्षेत्रात काम करीत असून आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिलेले आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या नागपूर विभाग संपर्कप्रमुख पदी संजीव भांबोरे यांची नियुक्ती...
अकोला जिल्हा प्रतिनिधी:-संजय चव्हाण.