महिलाच्या पुढाकाराने दुधमल गावाने केली दारुबंदी...


अकोला जिल्हा प्रतिनिधी:-संजय चव्हाण.

अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यामधील पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दुधलम येथील ग्रामपंचायत सरपंच वैशाली पंडित यांनी गावामध्ये दारूबंदी ठराव घेऊन पोलीस स्टेशन पिंजर चे ठाणेदार राऊत यांना देण्यात आला व गावात अवैधरित्या सुरू असलेले दारूधंद्या बाबत गावातील महिलांनी तशी तक्रार दिली त्यांच्या तक्रारींची दखल घेत ठाणेदार राऊत यांनी या प्रकरणाची चौकशी केली असता दारू या विषयामुळे युवा पिढी नशेच्या अधीन झालेली दिसून आली. तसेच गावातील सामाजिक वातावरण दूषित झाले दारूच्या आहारी गेलेले महिला व सामान्य नागरिकांना त्रास देत आहेत त्यामुळे काही कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. असे राऊत यांच्या निदर्शनास आले तसेच या त्रासाला कंटाळून सरपंच सचिव व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्यांच्या संमतीने दारूबंदीचा ठराव घेण्यात आला. सदर ठरावा करिता शंभर महिलांनी पोलीस कर्मचारी बीट जमदार रमेश खंडारे व कॉन्स्टेबल यांनी हात भट्टी दारू विक्रेत्यांचे घरी जात त्यांना समजावून सांगितले आहे व समजून ऐकले नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. पिंजर पोलिस स्टेशनचे ठाणेदार राऊत यांच्या सहकार्याने दुधलम गावांमध्ये 100% दारूबंदी झाल्याने गावात महिला आनंद व्यक्त करीत आहेत तसेच ठाणेदार राऊत यांनी एका दारूविक्री त्याला चांगलाच चोप दिल्यामुळे गाव दारू मुक्त झाले आहे.

Previous Post Next Post