औरंगाबाद येथे दि.२५व२६ डिसेंबर ला संपन्न झालेल्या झेप साहित्य संमेलनात हिवरा आश्रम जिल्हा बुलडाणा येथील प्राचार्य पंढरीनाथ शेळके यांना विविध सामाजिक उत्कृष्ट सेवा कार्याबद्दल मातोश्री हरणा बाई जाधव राज्यस्तरीय पुरस्काराने प्रसिद्ध साहित्यिक,विचारवंत संमेलन उदघाटक डॉ. ऋषिकेश कांबळे,डॉ.वासुदेव मुलाटे,के.एस.अतकरे प्रकाशक तथा कोषाध्यक्ष,मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद, रमेश अण्णा मुळे, संयोजक डी.एन. जाधव कवी संमेलन अध्यक्षा आशा डांगे,श्रीमती.ए.बी.साळवे इत्यादी मान्यवर हस्ते गौरविण्यात आले.प्राचार्य शेळके यांचे सामाजिक कार्य दिव्यांग कल्याण शैक्षणिक कार्य ,व्यसनमुक्ती प्रचार प्रसार, कोविड-19 मध्ये गरजूंना मदत,लसीकरण कार्यात सेवा कार्य, विवेकानंद आश्रम सेवा कार्यात सहभाग,जनजागृतीचे कार्य,साहित्य काव्य सहभाग ची दखल घेवून त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला.यावेळी साहित्यिक कवि / कवयित्री अड.विजयकुमार कस्तुरे,मनोहर पवार, डॉ.शुभांगी करपे,रामदास कोरडे, डॉ.सुभाष बागल,ज्योती सोनवणे,सुनीता कपाळे,अड सर्जेराव साळवे, अनिता देशमुख यांनी अभिनंदन केले.प्राचार्य शेळके यांना यापूर्वी विविध जिल्हास्तरीय,राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.त्यांना मिळालेल्या.पुरस्कार चे कौतुक सर्वत्र होत आहे
हिवरा आश्रम येथील प्राचार्य पंढरीनाथ शेळके राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित !
सिंदखेड राजा/सचिन खंडारे