सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील अनिकेत सैनिक स्कुलमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या त्या चार विद्यार्थ्यांनी सर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय सैन्यात भरती झाले . त्यांची साखरखेर्डा गावातून मिरवणूक काढण्यात आली .साखरखेर्डा येथील अनिकेत सैनिक स्कुल असून माजी सैनिक अर्जुन गवई हे गरीब आणि होतकरु विद्यार्थ्यांना देशाविषयी प्रेम , जागृक्ता या विषयी मार्गदर्शन करतात . सिमेवर लढताना तळहातावर जीव ठेवून शत्रुशी लढावे लागते , बर्फ , थंडी , ऊन , वारा , पाऊस यांची तमा न बाळगता भारतीय सैन्य डोळ्यात तेल घालून खडा पहारा देत आहे . म्हणूनच आपण निश्र्चित आहोत . विद्यार्थांच्या अंगी देशाभिमान जागृत राहावा आणि देशसेवेसाठी बलीदान करण्याची उर्जा निर्माण व्हावी यासाठी अर्जून गवई प्रशिक्षण देतात . त्याच्या संस्थेतील अजय डुकरे , मतिन शेख , नितीन यादव , ज्ञानेश्वर उबाळे यांनी भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी प्रशिक्षण घेतले . त्यांनी भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी सर्व परीक्षा उत्तीर्ण केल्या. आणि त्यांची निवड करण्यात आली . या सैनिक स्कुलमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते . त्यांची निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करुन गावातून मिरवणूक काढण्यात आली .
भारतीय सैन्यात भरती झालेल्या त्या चार युवकांची मिरवणूक.
सिंदखेड राजा/सचिन खंडारे.