राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
धारणी पासून जवळच असलेल्या खाऱ्या टेम्भूरू येथील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत चंदा सुखाराम भिलावेकर यांचा अवघ्या 27 मतांनी विजय झाला.तालुक्यात सदैव राजकारणाच्या बाबतीत चर्चेत असणाऱ्या खाऱ्या टेम्बरू ग्रामचायत येथे मागील सार्वत्रिक निवडणुकीत रिक्त असलेल्या पदाची पोटनिवडणूक झाली. त्या निवडणुकीत चंदा सुखाराम भिलावेकर यांचा 27 मतांनी विजय झाला आहे त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे .याप्रसंगी जयराम कासदेकर खाऱ्या टेम्बरू, बंटी ठाकूर, व रोहित पाल यांनी चंदाताई यांच् अभिनंदन केले.