जळगाव जामोद तालुक्यातील श्री आवाजीसिद्ध महाराज संस्थान , सुनगाव येथे बुलढाणा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने आयोजित व जळगाव जामोद तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या आयोजनाने उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मृत पावलेल्या कोरोना योद्धांना व CDS जनरल रावत व सैनिकांना भावपुर्ण श्रद्धांजली देण्यात आली.श्री आवाजीसिद्ध महाराज यांच्या प्रतिमा पुजन व महीला सभासद व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. अनिल नावंदर , राजेंद्र नहार व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले व त्यांचे संगोपन करण्यात येईल असे गिरीश केला यांनी सुनगाव टिम च्या वतीने आश्वत केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केमिस्ट कोहीनुर अनिल भाऊ नावंदर , मानद सचिव , MSCDA , प्रमुख उपस्थिती मध्ये BDCDA चे अध्यक्ष राजेंद्र नहार व सचिव गजानन शिंदे , उपाध्यक्ष प्रेमचंद जैन , संघटन सचिव अजिंक्य ठाकरे , गणेश बंगळे , संजय वंडाळे यांना केमिस्ट बांधवांनी शाल व श्रीफळ , पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी जेष्ठ सभासद हसमुखलाल उनडकाट, पवन कुमार जैस्वाल,श्री रमेश काळपांडे,कृष्णकुमार अग्रवाल, नारायण पाटील, विजय राठी , चतुर्भुज केला यांना स्मृती चिन्ह शाल व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
अभिनय क्षेत्रात विशेष कामगिरी करुन केमिस्ट संघटनेचे व तालुक्याचे नाव उज्ज्वल केल्यामुळे कार्यकारिणी सदस्य राजेश काळे व पालक संघटना , संचालक व्यापारी संघटना व पर्यावरण क्षेत्रात विशेष कामगिरी बजावत असल्यामुळे मा श्री अजय पलन यांना स्मृती चिन्ह शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष केमिस्ट कोहीनुर अनिल नावंदर यांनी येणाऱ्या स्पर्धेला स्पर्धेनेच तोंड द्यावे लागेल , संघटना आपल्या सभासदांच्या पाठीशी सदैव उभी आहे अशी ग्वाही दिली.BDCDA चे अध्यक्ष राजेंद्रजी नहार यांनी संघटनेने कोरोना काळात आलेल्या समस्या व संघटनेने केलेल्या उपाययोजना सांगितल्या. संपुर्ण सभासद कोरोना योद्धा म्हणून सत्कार सन्मान गौरव करणार असल्याचे सांगितले.BDCDA चे सचिव गजाननजी शिंदे , गणेशजी बंगळे यांनी यथोचित मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री चेतनजी ढाके व आभार प्रदर्शन तुषार पाटील यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण जळगाव जामोद तालुक्यातील केमिस्ट बांधवांनी अथक परिश्रम घेतले.