चिखलदरा आदिवासी बहुल भागासह अति महत्वाच्या आरोग्य विभागाच्या अधीनस्थ येत असलेले उपकेंद्रांची मध्ये भोंगळ कारभारा होत असल्याचा आरोप स्थानिक जनतेने केला आहे. आरोग्य अधिकारी श्री प्रधान जातिवाद करून आदिवासी नागरिकांचे जीवाशी खेळ करत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.चिखलदरा परिक्षेत्र अत्यंत आरोग्य विभागा करिता महत्वाचे आहे. चिखलदरा तालुक्यातील आदिवासी नागरिकांचे आरोग्य व्यवस्थित राहावे यासाठी शासनाने कोटी रुपये खुर्चीत घालून नागरिकांना सुविधा देण्याचा आटोकाट प्रयत्न वरिष्ठ अधिकारी व आरोग्य मंत्री नेहमीच करत असतात. त्या साठी चिखलदऱ्रा आरोग्य विभागा करिता स्पेशल विशेष निधीची तरतूद करण्यात येत असते.चिखलदऱ्या मध्ये ग्रामीण भागात बाल मृत्यू होऊ नये माता मृत्यू होऊ नये, इतरही आजारावर नियंत्रण राहावे.याकरिता वरिष्ठ स्तरावरून विशेष डॉक्टरांचे, पथक व सिस्टर यांचे मुक्कामी कार्यालय वास्तव्य भरारी पथक निर्माण करण्यात येते सोबतच ज्या आरोग्य विभागा करिता ॲम्बुलन्स निवासस्थान व वाढीव पगार सुद्धा शासना कडून पुरविण्यात येते तरी सुद्धा चिखलदरा तालुक्या मध्ये मातामृत्यू बालमृत्यू व अन्य मृत्यूच्या प्रमाणात सर्वात मोठी वाढ झालेली आहे आरोग्य अधिकारी श्री प्रधान कागदोपत्री अहवाल, दरवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करून चिखलदरा आरोग्य विभाग ऑल दि वेल, अशा आशयाचा देखावा निर्माण करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप चिखलदरा तालुक्यातील आदिवासी नागरिकांनी केला आहे श्री प्रधान यांच्याशी संपर्क केला असता भ्रष्टाचाराने चूर झालेल्या ,भाषेत,उद्धट प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, जामली आर येथील तक्रार मिळाली आहे पण आपल्याला व तक्रार कर्त्याला जे करायचे ते करून घ्या, त्या ठिकाणी डॉक्टर नाहीत, अशा भाषेत बोलून फोन स्वीच ऑफ केल्याने या वरुन सिध्द होते. तालुक्याची संपूर्ण आरोग्य यंत्रणा असलेली असताना, मुख्य आरोग्य अधिकारी अशा पद्धतीचे उद्धट बोलणे किती योग्य हा तर चर्चेचा विषय बनला आहे.काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी असे सांगितले की आरोग्य अधिकारी श्री प्रधान यांची येथील राजकीय नागरिकांसोबत आर्थिक हितसंबंध बरेच काळ चिखलदरा तालुका येथे आरोग्य अधिकारी कार्यरत आहेत त्या मुळे ती या ठिकाणी राजकीय हिता करिता राजकारण तर करत नाहीत ना? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे त्या मुळेच त्यांच्या वर कोणत्या हि वरिष्ठ अधिकाराचा वचक नसल्याचे दिसून येते.जामली आर येथील सरपंच रामकिशन कासदेकर यांनी पत्राद्वारे मागणी केली.की जामली आर येथे कोणी ही आरोग्य अधिकारी येत नसून या भागातील आरोग्य यंत्रणा खोळंबलेली दि १२/११/२१रोजी याठिकाणी डॉक्टर उपस्थित नसल्याने कुमारी पायल बेलसरे या लहान मुलीचा मृत्यू झाला होता अशा आशयाचे निवेदन सुद्धा त्यांनी सभापती यांना देण्यात आले आहे. असे त्यांनी सांगितले ज्या ठिकाणी तत्काळ डॉक्टरची नियुक्ती करा अन्यथा चिखलदरा आरोग्य विभागाचे अधिकारी प्रधान यांची बदली करा अशी मागणी स्थानिक जनतेकडून होत आहे
चिखलदरा तालुका आरोग्य अधिकारी, प्रधान, यांच्या नाहरकते धोरणा मुळे,आरोग्य यंत्रणा ढासळली शेकडो बाल मृत्यू, गरोदर मृत्यू,(आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार) सरपंच आर. आर. कासदेकर यांचा गंभीर आरोप,
राजु भास्करे /गौलखेडा बाजार