प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या जलजिवन मिशनला आदिवासी भागातुन प्रचंड प्रतिसाद...


 राजु भास्करे /चिखलदरा 

केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या मार्गदर्शन सुचनांचे पालन करीत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट म्हणून राबविण्यात येत असलेल्या हर घर नल से जल उपलब्ध करून देण्यासाठी २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरात दरडोई ५५ लिटर पिण्याचे  पाणी वैयक्तिक नळ जोडणीद्वारे उपलब्ध करून देण्याला पहाडातुन सुरवात झाली असुन अनेक गावातील नागरिकांच्या दारात पाण्याची गंगा वाहत असल्याचे सुखद चित्र सध्या मेळघाटात पाहायला मिळत आहे. जमिनीतील पाण्याची पातळी उन्हाळ्यात सातत्याने खालवत जात असल्यामुळे या आदिवासी भागात पाण्याची भिषण टंचाई पहाडातील गावात निर्माण होते. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सध्या सात ग्राम पंचायतीत जलजिवन मिशनची कामे सुरू करण्यात आली असुन या कामावर विभागीय आयुक्त पियुष गोयल, जिल्हा अधिकारी पवनित कौर आणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अविशांन्त पांडा यांनी जलजिवन मिशनच्या कामावर विषेश लक्ष केंद्रित केले असुन टिंगर्या, गोंडवाडी, मोखा, अशा गावात जलजिवन मिशनगंर्त पाणीपुरवठा सुरू असुन जनतेची तहान भागविली जात आहे. राज्यातील ३४ जिल्हातील वाड्यात वस्त्यांमध्ये टप्प्या टप्प्याने नळाद्वारे जनतेला पाणी पुरवठा करण्याचे नियोजन सुरू केले आहे. मेळघाटातील पाण्याचा प्रश्न दर उन्हाळ्यात भिषण रूप धारण करतो. पाण्यासाठी कासावीस झालेल्या जनतेला आता त्यांच्या दारातच पाणी उपलब्ध होणार असल्यामुळे जनतेची नाल्या खोर्‍यातील जनतेची पायपीट वाचणार आहे.

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट असल्यामुळे जलजिवन मिशनच्या कामावर सर्वाचेच लक्ष केंद्रित असुन या कामांची पाहणी करण्यासाठी निवृत्त अभियंत्याकडून देखरेख करण्यात येत आहे.

राजेंद्र सावळकर

कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद अमरावती

Previous Post Next Post