दहा लाख रुपयांचा गांजा पकडला ; महिलेसह तिघांना अटक...


 बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सुरज देशमुख R.C24 न्युज 

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या पथकाने अवैध धंद्याच्या विरोधात धडक मोहीम हाती घेतली असून दररोज अशा व्यवसायांवर कारवाई केल्या जात आहे दरम्यान आज परराज्यातून बुलढाणा जिल्ह्यात आलेला 10 लाख रुपये किमंतीचा 1 विक्टल गांजा बुलढाणा पोलिसांनी पकडला आहे याप्रकरणी पोलीसांनी 3 जणांना अटक केली आहे अटक केलेल्या तिघांपैकी एक महिला आहे.परराज्यातून हे तिघे जण बुलढाणा जिल्ह्यात गांजा घेऊन येत असताना बुलढाणा जिल्ह्यातील किन्ही महादेव फाटयाजवळ रात्री 3 वा नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी त्यांना थांबले असता त्यांच्या ताब्यातुन १० लाख रुपये किमतीचा एक क्विटल गांजा तसेच आरोपींच्या ताब्यातून तिन मोबाईल, दोन मोटार सायकल असा एकुण १० लाख ८१ हजार ५०० रूपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन पोलीस स्टेशन हिवरखेड येथे NDPS कायदयान्वये तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Previous Post Next Post