कर्नाटक राज्यात बेंगलुरु येथे समस्त हिंदुस्थान चे आराध्य व आपले दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पूतळयाची विटंबनेच्या निषेधार्थ खामगांव येथे अखिल भारतीय मराठा महासंघ बुलडाणा जिल्हा व खामगांव शहर च्या वतीने आरोपिला कड़क शिक्षा व्हावी या करिता रविवार दिनांक 19 डिसेबर रोजी सकाळी आक्रोश आंदोलन करण्यात आले.छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ़ पुतळयास सर्वप्रथम दुग्धाभिषेक करून छत्रपती शिवरायांच्या व अखिल भारतीय मराठा महासंघाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी घटनेच्या निषेधार्थ आरोपी विरुद्ध तीव्र रोष व्यक्त करून जोरदार घोषणाबाजी व निर्देशने करण्यात आली.व त्यानंतर उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या मार्फ़त माननीय महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महोदय व माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्या नावे निवेदन प्रशासकीय इमारत खामगांव येथे उपविभागीय अधिकारी साहेब(महसूल) यांना देण्यात आले.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने खामगांव येथे जोरदार आक्रोश आंदोलन...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सुरज देशमुख R.C24 न्युज