शिक्षकापासून प्रत्येकांनी प्रेरणा घ्यावी - .गटशिक्षण अधिकारी - अबदने..रताळी येथे सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार !

 


सिंदखेड राजा/सचिन खंडारे

सिंदखेड राजा तालुक्यातील रताळी येथे दिनांक 18 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या विविध शाळेमधील शिक्षकांचा सत्कार गट शिक्षणाधिकारी सिंदखेड राजा मा . अदबने यांच्या हस्ते रताळी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये करण्यात आला .यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी माधवरावबापू देशमुख .शिक्षक नेते भानुदास लव्हाळे . हे होते .यावेळी सोडतीतील वयोवृद्ध शिक्षक श्री पुंजाजी वाढे .रताळी येथील श्री गजानन पाटील .श्री शिवाजी हायस्कूल चे मुख्याध्यापक समाधान झनके .या सर्वांना जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रताळी यांच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पहार गुच्छ देऊन भावपूर्ण त्यांचा सत्कार करण्यात आला .यावेळी सेवानिवृत्त शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले .त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी अदबने .यांनी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या कार्यांचा गौरव केला व सेवानिवृत्त शिक्षक हे आपले आदर्श असून त्यांच्यापासून प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी असे सांगितले .यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक तेजराव देशमुख यांनी केले तर आभार स अ .शिक्षक .सुधाकर रिंढे .तर आभार प्रदर्शन .शिक्षक कैलास पऱ्हाड व शिक्षिका .सुनिता येवले यांनी केले.

Previous Post Next Post