सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आ. डॉ . शशिकांतजी खेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 18 डिसेंबर रोजी साखरखेर्डा येथील पलसिद्ध मठ संस्थान मध्ये त्यांचा भव्य दिव्य अभिष्टचिंतन सोहळा पार पडला साखरखेर्डा व परिसरातील शिवसैनिकांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा भव्यदिव्य सत्कार केला ..यावेळी साखरखेर्डा येथून भव्यदिव्य मोटर सायकल रॅली काढण्यात आली .तसेच त्यांचे सभास्थळी आगमन होताच जीसीबी मधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली .नंतर साखरखेर्डा येथील शिवसैनिकांच्या वतीने त्यांचा भलामोठा पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले . नंतर झालेल्या कार्यक्रमांमध्ये माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या धर्मपत्नी डॉ . उषाताई खेडेकर यांनी .संसाराचा गाडा व डॉ . शशिकांतजी खेडेकर यांच्यासोबत काम करताना आलेले किस्से सांगितले ..यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला .यावेळी प्रास्ताविक भाषण शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव मोरे यांनी केले .त्यानंतर मेहकर आ .डॉ . संजय रायमुलकर यांनी डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला .तसेच युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले .त्यानंतर डॉ .शशिकांत खेडेकर यांनी सत्काराला उत्तर देताना आपले मनोगत व्यक्त केले .की सर्व शिवसैनिकांनी मला भरभरून प्रेम दिले .2019 च्या विधानसभेचा जो पराभव झाला याची सल प्रत्येक शिवसैनिकांच्या मनामध्ये आहे .परंतु गट-तट बाजूला सारून शिवसैनिकांनी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये कामाला लागावे .व मतदार संघातील कोणत्याही शिवसैनिकाला वाऱ्यावर सोडणार नाही .असे सांगितले .यानंतर आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी .शशिकांत खेडेकर हे अतिशय शांत व मृदू स्वभावाचे असून .आमदार असतांना त्यांनी विविध प्रश्न मतदारसंघाचे मार्गी लावले ..2019 जो त्यावेळी आम्हाला अशी खात्री होती की डॉ . खेडेकर यांनी अनेक विकास कामे केली जवळपास अडीचशे सभामंडप त्यांनी मतदारसंघात गावांमध्ये दिले . आम्हाला आत्मविश्वास नडला .व 2024 पर्यंत डॉ . शशिकांत खेडेकर यांनी मतदार संघामध्ये जी कामे मार्गी लागली नाही त्याचा पाठपुरावा करावा व जी कामे चांगली झाली नाहीत त्यासाठी आवाज उठवावा .व प्रखर विरोधी पक्षांची भूमिका त्यांनी पार पाडावी अशी ही यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगितले .यावेळी मंचावर आमदार संजय रायमुलकर .युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव .माजी आमदार डॉ . शशिकांत खेडेकर खासदार प्रतापराव जाधव...मजी पंचायत समिती उपसभापती बद्रीभाऊ बोडखे .डॉक्टर शशिकांत खेडेकर यांची सर्व कुटुंब .साखरखेर्डा माजी सरपंच पुनमताई महेंद्र पाटील . सर्व शिवसेनेचे पदाधिकारी .कार्यकर्ते उपस्थित होते .यावेळी रॅलीमध्ये येणाऱ्या शिवसैनिकांसाठी चहा . पाणी नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती ....या कार्यक्रमासाठी साखरखेर्डा पोलीस स्टेशन तर्फे कडक बंदोबस्त लावण्यात आला होता ..
आ. डॉ . शशिकांत खेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त साखरखेर्डा भव्य सत्कार तर डॉ . खेडेकर यांनी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघांमध्ये विरोधी पक्षाची भूमिका पार पाडावी -खा .प्रतापराव जाधव .
सिंदखेड राजा/सचिन खंडारे