बहुतांश प्रभागात तिरंगी तुल्यबळ लढतीचे स्पष्ट संकेत?मात्र काँग्रेस पक्षाने प्रचारात घेतली आघाडी...


संजय कारवटकर/यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

निवडणूक वृत्त विश्लेषण....

यवतमाळ जिल्ह्यातील नगर पंचायत राळेगांव ची निवडणूक २१ डिसेंबर रोजी होणार असून, निकाल हा 19 जानेवारीला लागणार आहे , राळेगाव येथील चौदा प्रभागात ८२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.आठ प्रभागात तिरंगी तुल्यबळ लढतीचे स्पष्ट संकेत मिळालेले आहे. तर दोन ठिकाणी एकास एक,दोन ठिकाणी अपक्ष तर दोन ठिकाणी चौरंगी लढत होईल असे च चित्र आहे. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांशी,भाजपा कमी ठिकाणी तर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उमेदवारांशी बहुतांश ठिकाणी लढत आहे.काँग्रेस पक्षात चार पाच ठिकाणी नेहमी प्रमाणे झालेली बंडखोरी मोडून काढायला नेते कमी पडले.पण याचा फार मोठा फरक पडणार नाही असे वातावरण तयार करण्याचे प्रयत्न पक्षश्रेष्ठी करत आहे.मागील वेळी दहा नगरसेवक नगर सेविका निवडून आणणारा भाजपा या वेळी नकारार्थी मतं,अंतर्गत मनमुटाव,मतभेद यामुळे उमेदवार निवडी पासून तर आता प्रत्यक्ष निवडणूक रंणागणात मागे सरकत आहे.आज च्या राजकीय स्थिती नुसार  अकरा ठिकाणी काँग्रेस उमेदवार.दोन ठिकाणी अपक्ष तर एका ठिकाणी शिवसेना उमेदवार आघाडीवर आहेत पण मात्र दररोज चे समीकरण पाहता कोण? केव्हा?कोठे?कशी?बाजी पलटवेल हे मात्र नक्की सांगता येत नाही, तरी पण आताची परिस्थिती हि काँग्रेस पक्षाची आहे असी चर्चा संपुर्ण राळेगावात जोरदारपणे सुरू आहे .तीन प्रभागातील निवडणूका ओ.बी.सी.आरक्षण मुद्द्यामुळे दि 18 जानेवारीला होण्याची शक्यता आहे.सर्व च उमेदवारां चा प्रचार सुरु आहे. तर निवडणूक रिंगणात असलेल्या  तत्कालीन नगरसेवक आणि नगरसेविकांना पाच वर्षांत काय दिवे लावले?कोणती विकास कामे केली?असे नानाविध प्रश्न विचारुन मतदार भांडाऊन सोडत आहे तर काँग्रेस पक्ष प्रचारात पुर्ण ताकत लावतानी दिसत आहे हे मात्र विशेष

Previous Post Next Post