हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.
हिवरखेड येथे काही नामांकित नागरिकांची धार्मिक कार्यातून धार्मिक कार्यात विविध पुरस्कारासाठी वर्णी लागली आहे, हिवरखेडकरांची मान या पुरस्काराने उंचावणार आहे, बुलढाणा जिल्ह्यातील आसलगाव येथील मनगळेश्वर संस्थान मध्ये २० डिसेंबर गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त एकदिवसीय धर्मपरिषदेचे आयोजन करणयात आले आहे, प्रमुख मार्गदर्शक ह,भ,प, गजानन महाराज कोल्हे, (काकोडा,)विजय महाराज सरोदे, सुरेश महाराज खिरोडकार , व आयोजक अश्विन महाराज कवरे करतील तसेच अमरावती,आकोला, बुलढाणा, जिल्यासह अनेकांच्या पुरस्कारात हिवरखेड येथील पुरुषत्म गावंडे यांना (धर्म भूषण) पुरस्कार , वनिता वाकोडे तळेगाव,यांना( वारकरी सेवा रत्न पुरस्कार)अर्जुन चिंतामणजी खिरोडकर यांना (वारकरी सेवारत्न पुरस्कार)महेंद्र भोपळे यांचा स्तकार, ऋषी केश राऊत यांचा सत्कार ,रवी कराळे यांना वारकरी रत्न, नागोराव आबाळकर, राधेश्याम सोनोने, प्रभात अबाळकर, तर बालकीर्तनकार कृष्ण महाराज सदाफळे यांना कीर्तन रत्न पुरस्कार आणि पल्लवी खिरोडकर यांचा सत्कार करण्यात येत आहे, हे पुरस्काराचे मस मानकरी ठरत आहेत, आणि याना पुरस्कार धार्मिक सांप्रदायातील महाराजांच्या हस्ते व राजकिय आमदार,खासदार याच्या हस्ते देण्यात येत आहेत, हिवरखेड भूषणकर्ते पुरस्काराचे मानकरी ठरल्याने त्याचे गावात कौतुक होत आहे,