विशेष पथकाची ग्राम उमरा येथे अवैध रित्या दारू बाळगून विक्री करणाऱ्या वर धाड...


अकोट ता.प्रतिनिधी:-सय्यद शकिल.

दिनांक १६/१२/२०२१ रोजी विशेष पथक मा पोलीस अधीक्षक जी श्रीधर साहेब व अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत मॅडम यांच्या आदेशाने ग्राम उमरा येथे अवैध धंद्यावर रेड करण्याकामी पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमी दाराकडून खात्रीलायक बातमी मिळाली की दोन इसम अवैध रित्या दारू बाळगून विक्री करीत आहे येथे धाड टाकली असता (१) न्यानेश्वर सहदेव भारसाकले वय ४५ वर्ष रा आठवडी बाजार ग्राम उमरा हा आपल्या घरात अवैध रित्या दारू बाळगून विक्री करतानां मिळून आला त्याच्या जवळून देसी दारू ९९९ संत्रा चे १९६ कवॉटर किंमत ७,८४० रू चा मुदेमाळ जप्त करण्यात आला आहे. (२)गोविंदा रामराव इंगळे वय ३२ वर्ष रा गोनडपुरा ग्राम उमरा हा आपल्या दुकानात अवैध रित्या दारू बाळगून विक्री करतानां मिळून आला त्याच्या जवळून (१)देशी दारू ९९९ संत्रा चे ५१ कवॉटर किंमत २,०४० रू (२)इंग्लिश मॅक डाऊनलस चे १२ कवॉटर किंमत १,९२० रू (३)इंग्लिश इम्पीरियल ब्ल्यू चे ९ कवॉटर १,३५० रू असा एकूण ५,३१० रू चा मुदेमाल जप्त करण्यात आला असून त्याच्या विरुद्ध पो.स्टे.अकोट ग्रामीण येथे महाराष्ट्र दारू बंदी कायदा अन्यवे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.दोन कारवाहीत दोन आरोपिन विरुद्ध गुह्याची नोंद करण्यात आली असून त्याच्या जवळून एकूण १३,१५० चा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे.सदर कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक जी.श्रीधर साहेब अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील साहेब व त्यांच्या पथकाने केली.

Previous Post Next Post