जळगाव जामोद समाजवादी पक्षाच्या वतीने मुस्लिम बहुल भागात आंगनवाड़याची महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ताई ठाकूर यांच्याकडे केली मागणी...


 जळगाव जामोद प्रतिनिधी :-

दिनांक १६ डिसेंबर रोजी काँग्रेस पक्षाचा कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद येथे मेळावा असल्याकारणाने राज्यातील महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ताई ठाकूर ह्या आल्या होत्या. त्यावेळी त्यांना समाजवादी पार्टीच्या वतीने महिला व बालकल्याण मंत्री सौ.यशोमती ठाकुर यांना एका निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की जळगांव जामोद शहरात  प्रभाग क्र 4- सुलतान पूरा प्रभाग क्र 5- काजीपूरा व प्रभाग क्र 9- राणी पार्क मध्ये मुस्लिम बहुल बस्ती असून येथे शेतकरी, शेतमजुर, गोरगरीब व सर्वसाधारण लोकांच्या प्रमाण जास्त आहेत व या प्रभागाचा भौगोलीक विस्तार मोठा आहे. हया प्रभागातील उपलब्ध अंगणवाड्यांची संख्या पुरेशी नसल्यामुळे प्रभागातील नागरिकांचे अपत्य प्रवेश मिळत नसल्यामुळे वंचीत राहतात. त्यामुळे त्यांना पोषक आहार व कार्यालयीन कागदपत्रे मिळत नसल्यामुळे त्यांना भविष्यात शैक्षणिक व आरोग्य विषयक नुकसान संभवते. तरी कृपया प्रभाग क्र 4- सुलतान पूरा प्रभाग क्र 5- काजीपूरा प्रभाग क्र 9- राणी पार्क या ठिकाणी अंगणवाड्यांची अत्यंत आवश्यकता आहे..तरी आपण आपल्या स्तरावर योग्य ती कार्यवाही करून या ठिकाणी आंगनवाड़या देण्यात यावी अशी अश्याचे निवेदन समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष सैय्यद. नफिस यांच्या नेतृत्वात मा.ना.सौ.यशोमती ठाकूर यांना देण्यात आले.यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष मुश्ताक जमादार व ए. आर साबीर अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post