दिनांक 19 डिसेंबर 2021 ला तेली समाज जळगाव जामोद व संग्रामपूर तालुका जि. बुलढाणा यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित श्री संत संताजी जगनाडे महाराज भव्य मोफत वधू-वर व पालक परिचय मेळावा सांस्कृतिक भवन जळगाव जामोद येथे संपन्न झाला. पालकांचा वेळ ,श्रम ,पैसा वाचावा या उद्देशाने आयोजित या मेळाव्यात 272 वर- वधुनी सहभाग घेतला. विष्णुपंत मेहरे यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या विवाह सोहळ्याच्या उद्घाटक सौ शोभाताई रामदास तडस नगराध्यक्ष देवळी या होत्या. सामाजिक विकासाकरिता अशा प्रकारचे मेळावे आवश्यक असल्याची भावना उद्घाटक यांनी व्यक्त केली. अशा मेळाव्यातून समाजाचे एकीकरण होते. तेली समाजाची ही एकता अशीच अबाधित असल्यामुळे ओबीसी आरक्षणा संदर्भात महत्त्वाची भूमिका समाज पार पाडत असल्याची भावना महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभेचे महासचिव डॉक्टर भूषण कर्डिले यांनी व्यक्त केली. तसेच महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभेचे कोषाध्यक्ष गजूनाना शेलार ,जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय जी कुटे , कार्यक्रमाचे अध्यक्ष विष्णुपंत जी मेहरे यांची शुभेच्छापर भाषणे झाली. अमरावतीच्या प्राध्यापक सौ.मोनिकाताई उमक यांनी उपस्थित युवक व युवतींना उद्योजकतेवर मार्गदर्शन केले. विविध योजनांची माहिती दिली. उद्योजक बना म्हणून संदेश दिला. सदर मेळाव्यासाठी राज्यातून बहुसंख्येने समाज बांधव, वधू- वर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचालन अनिल भगत, प्रास्तविक नंदकिशोर काथोटे ,पाहुण्यांचा परिचय व मेळाव्याची पार्श्वभूमी रमेश आकोटकार तर आभार शाम पांडव यांनी केले. सदर मेळावा यशस्वितेकरिता नंदकिशोर काथोटे , अभिमन्यू भगत, श्याम पांडव, संजय चोपडे ,रमेश आकोटकर, गणेश जामोदे, अनिल भगत, शरद गोमासे,गणेश गोतमारे , शाम आकोटकार , गणेश अरूडकार, मंगेश मंडवाले व समाज बांधवांनी परिश्रम घेतले.
तेली समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय मेळावा संपन्न...
जळगांव जा.प्रतिनिधी:-