जळगांव जा.प्रतिनिधी;-
कर्नाटक राज्यातील बेंगलूर येथे महाराष्ट्र राज्याचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची कर्नाटक मधील भाजपा कार्यकर्त्यांनी तोडफोड करून समस्त शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावल्या त्याबद्दल जळगाव जामोद तालुका शिवसेनेच्या वतीने निषेध नोंदवित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांचा राजीनामा घ्यावा करिता देण्यात आले दिनांक 20 डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन. कर्नाटक मधील बंगलोर येथे दिनांक 18 डिसेंबर रोजी भाजपाच्या समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली व त्याबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाशी बोलताना असे म्हटले की अशा छोट्या मोठ्या घटना घडत असतात असे वादग्रस्त विधान करून समस्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम करणाऱ्या तसेच शिवप्रेमी भावना दुखावले आहेत. त्याचा जळगाव जामोद तालुका शिवसेनेच्या वतीने निषेध करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कर्नाटक चे मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा असे निवेदनात म्हटले आहे तसेच भाजपाचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडवणीस व प्रवीण दरेकर यांच्यासह महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना होऊन सुद्धा शब्दही काढला नाही त्यामुळे भाजपाचे शिवाजी महाराजांविषयी असणारे प्रेम बेगडी आहे हे राम और बगल मे छोरी अशी आहे तरी महाराष्ट्रात भाजपच्या नेत्यांनी सुद्धा तमाम शिवप्रेमींची जाहीर माफी मागावी अन्यथा जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने भाजपा विरोधात शिवसेनेच्या पद्धतीने उग्र आंदोलन करण्यात येईल तसेच भाजपच्या नेत्यांना जळगाव हद्दीत प्रवेश करू दिला जाणार नाही असा इशारा जळगाव जामोद तालुका शिवसेनेच्यावतीने देण्यात आला. सदर निवेदन देतेवेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे, जळगाव जामोद तालुका प्रमुख गजानन वाघ, महिला आघाडी तालुकाध्यक्ष माधुरीताई राणे,रोजतकार ताई,नगरसेवक रमेश ताडे, उपतालुकाप्रमुख देविदास घोपे, उपतालुका प्रमुख पुंडलिक पाटील, अशोक टावरी, संजय भुजबळ, शुभम पाटील उपजिल्हाप्रमुख युवा सेना, दिलीप आकोटकार, अरविंद भारसाकळे, राजेंद्र पांधी,मंगेश कतोरे, शेख चांद शेख बब्बू कुरेशी,देवा उमरकर, सुभाष माने, पांडुरंग उगले, अरुण सोनोने, गोपाल ढगे, युवराज देशमुख, सूनील खवले, रामभाऊ केदार, रमेश हागे, राधेश्याम केला, मुस्ताक भाईजान,सुनील गवई, यांच्यासह बहुसंख्य पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.