यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्याला गारपिटीने झोडपले,शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान...


 संजय कारवटकर/ यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

यवतमाळ जिल्ह्यातील अनेक भागात अकाली पावसाने व गारपिटीने झोडपल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे बाभूळगाव तालुक्याला दि 28तारखेला अकाली पावसाने व गारपिटीने कोटंबा,जगणोरी, बाभूळगाव शहर,आसेगाव,राणी अमरावती, आणि जवळ पासच्या गावांमध्ये जोरदार वारा,पावुस,व गार पडल्याने तुरीच्या पिकाचे भरपूर नुकसान झाले आहे,यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील अनेक गावात सुध्दा गारपिटाची साधारण रेव पडली आहे मात्र बाभूळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना जोरदार गारपिटाचा फटका बसला आहे तरी वरिष्ठ अधिकारी यांनी पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी होतानी दिसतं आहे

Previous Post Next Post